शाळेच्या छतावर डेंग्यूच्या अळ्या
By Admin | Updated: September 22, 2016 03:00 IST2016-09-22T03:00:59+5:302016-09-22T03:00:59+5:30
शहरात डेंग्यू, मलेरियाच्या साथींनी थैमान घातले आहे.

शाळेच्या छतावर डेंग्यूच्या अळ्या
पनवेल : शहरात डेंग्यू, मलेरियाच्या साथींनी थैमान घातले आहे. साथीच्या रोगाबाबत नागरिकांमध्ये जनजागृतीचा अभाव असल्याने हा रोग पसरत असल्याचे दिसून येत आहे. खारघरमधील एपीजे शाळेच्या टेरेसवर प्लास्टीकच्या बादलीत डेंग्यूच्या अळ्या सापडल्याचे सिडकोच्या आरोग्य विभागाच्या निदर्शनास आले आहे.
यासंदर्भात सिडकोच्या अधिकाऱ्यांनी शाळेला परिसर स्वच्छ ठेवण्याचा सल्ला दिला आहे. तसेच शाळेतील शिक्षकांना डेंग्यू आजाराबद्दल माहिती दिली. खारघरसह सिडकोच्या विविध नोडमध्ये मोठ्या प्रमाणात डेंग्यूने थैमान घातले आहे. यासंदर्भात लोकमतने वृत्त प्रकाशित केले होते. यानंतर सिडकोने शाळांमध्ये पाहणी करून त्याठिकाणी औषध फवारणी सुरू केली आहे. या दरम्यान एपीजे शाळेत रंगरंगोटीचे काम सुरू असताना टेरेसवर त्या बादल्या तशाच ठेवल्याने डासांचीही पैदास झाली. यासंदर्भात सिडकोचे आरोग्य अधिकारी बी.एस. बाविस्कर यांनी सांगितले की, यासंदर्भात संबंधित शाळेला योग्य त्या सूचना केल्या असून या साथीच्या रोगांवर आळा घालण्यासाठी आम्ही योग्य ती खबरदारी घेत आहोत. (प्रतिनिधी)
>औषध फवारणी
शाळेतील शिक्षकांना डेंग्यू आजाराबद्दल माहिती दिली. खारघरसह सिडकोच्या विविध नोडमध्ये मोठ्या प्रमाणात डेंग्यूने थैमान घातले आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. यानंतर सिडकोने शाळांमध्ये पाहणी करून औषध फवारणी सुरू केली आहे.