शहरात डेंग्यूचा कहर सुरूच
By Admin | Updated: September 5, 2016 03:37 IST2016-09-05T03:37:59+5:302016-09-05T03:37:59+5:30
डेंग्यूची लागण झाल्याची घटना ताजी असताना येथील नांदिवली परिसरातील सर्वाेदय पार्क गृहसंकुलात १५ ते २० जणांना या आजाराने ग्रासले आहे.

शहरात डेंग्यूचा कहर सुरूच
डोंबिवली : कल्याण शहरात एकाच कुटुंबातील तिघांना, तर डोंबिवलीत सहा जणांना डेंग्यूची लागण झाल्याची घटना ताजी असताना येथील नांदिवली परिसरातील सर्वाेदय पार्क गृहसंकुलात १५ ते २० जणांना या आजाराने ग्रासले आहे.
सोहम तावडे या १४ वर्षीय मुलाला मुलुंड येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या गृहसंकुलाच्या मागील बाजूला असलेल्या सोसायट्यांमध्येही डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. याची माहिती महापालिकेला दिल्यानंतर ई प्रभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन औषधफवारणी केली.
आरोग्य विभागाच्या पथकानेही घटनास्थळी भेट देऊन संबंधित परिसरात सर्वेक्षण करून गृहसंकुलातील आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. तीन महिन्यांत ५६५ संशयित रुग्ण आढळले आहेत. सणासुदीच्या काळात अधिक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)