शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

धनगर आरक्षणासाठी निदर्शने,पुणे ते मुंबई दिंडी काढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 04:54 IST

धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण देण्याच्या मागणीसाठी गुरुवारी आझाद मैदानात धनगर समाजातील महिलांनी एक दिवसीय उपोषण करत निदर्शने केली. यावेळी आरक्षण मार्गदर्शन मेळावाही घेण्यात आला.

मुंबई - धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण देण्याच्या मागणीसाठी गुरुवारी आझाद मैदानात धनगर समाजातील महिलांनी एक दिवसीय उपोषण करत निदर्शने केली. यावेळी आरक्षण मार्गदर्शन मेळावाही घेण्यात आला.आझाद मैदानात करण्यात आलेल्या निदर्शनावेळी अहिल्याक्रांती प्रतिष्ठान प्रेरित क्रांती सेनेने सरकारला दिलेल्या आश्वासनाची आठवण करून दिली. तसेच शासनाने बोलावलेली भेट नाकारत या प्रकरणी निर्णय जाहीर करण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान या प्रकरणी आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांच्यासोबत बुधवारी झालेल्या बैठकीत याचिकाकर्ते हेमंत पाटील यांनी आरक्षणासाठी पुणे ते मुंबई दिंडी काढणार असल्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचे सांगितले.याआधी पुणे ते मुंबई अहिल्यादेवी दिंडी काढण्याचा इशारा पाटील यांनी दिला आहे. त्याअनुषंगाने आदिवासी विकास मंत्री यांनी दिंडी काढणाºया संघटनांना चर्चेसाठी बोलावले. मात्र सुमारे अर्धा तास चर्चा झाल्यानंतरही या प्रकरणी तोडगा निघू शकला नाही. पाटील म्हणाले, मंत्री महोदयांनी टिसचा सकारात्मक अहवाल लवकरच सादर करण्याचे आश्वासन दिले. तसेच दिंडी न काढण्याचे आवाहन केले. मात्र आता आश्वासन नको, तर निर्णय हवा आहे. धनगर समाजाचा सरकारवर विश्वास आहे. मात्र येत्या चार दिवसांत निर्णय जाहीर न झाल्यास १२ मार्च रोजी पुण्याहून दिंडी निघेल. त्यानंंतर धनगर समाज मोठ्या संख्येने १४ मार्चला मंत्रालयावर धडक देईल, असा इशाराही पाटील यांनी दिला.

टॅग्स :reservationआरक्षणMaharashtraमहाराष्ट्र