ठाण्यात मुख्यमंत्र्यासमोर कुपोषणाविरोधात निदर्शने
By Admin | Updated: September 29, 2016 15:16 IST2016-09-29T15:16:26+5:302016-09-29T15:16:26+5:30
- ठाण्यातील नियोजन भवनमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर श्रमजीवीच्या कार्यकर्त्यांनी कुपोषीत बालकांसाठी तीव्र निदर्शने केली.

ठाण्यात मुख्यमंत्र्यासमोर कुपोषणाविरोधात निदर्शने
>ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. २९ - ठाण्यातील नियोजन भवनमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर श्रमजीवीच्या कार्यकर्त्यांनी कुपोषीत बालकांसाठी तीव्र निदर्शने केली.
मुख्यमंत्री साहेब आमची पोरं वाचवा, अन्नावाचून मरत आहेत, त्यांना खायला द्या, कुपोषण दूर करा. असा आक्रोश करतानाच ' ये आजादी झूठी है, देश की जनता भूखी है' अशा घोषणा देऊन त्यांनी जोरदार निषेधही केला. पोलिसांनी ५० कार्यकर्त्यांना अटक केली आहे.