दलित तरु णाच्या हत्येच्या निषेधार्थ निदर्शने
By Admin | Updated: May 11, 2014 00:08 IST2014-05-10T20:43:14+5:302014-05-11T00:08:51+5:30
कल्याण जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव यांच्या नेतृत्वाखाली असंख्य अनुयायांनी तीव्र निदर्शने करून याबाबत नायब तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांना निवेदन दिले़

दलित तरु णाच्या हत्येच्या निषेधार्थ निदर्शने
कल्याण -अहमदनगर जिह्यातील दलित तरु णाची अत्यंत अमानुषपणे हत्येचा निषेधार्थ कल्याण तहसील कार्यालयासमोर रिपिब्लकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पक्षातर्फे कल्याण जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव यांच्या नेतृत्वाखाली असंख्य अनुयायांनी तीव्र निदर्शने करून याबाबत नायब तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांना निवेदन दिले़
या आंदोलनामध्ये कल्याण शहर अध्यक्ष रामा कांबळे, माजी नगरसेवक भीमराव डोळस, अरु ण पाठारे, विशाल पगारे, संजय गायकवाड, संग्राम मोरे, दासू ठोंबे संतोष जाधव, विशाल शेजवळ आदींसह आंबेडकरी अनुयायी सहभागी झाले होते.