लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना शिवीगाळ करणारे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भाषा दानवासारखी आहे, अशी खरमरीत टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली. उद्या शुक्रवारपासून राज्यभर भाजपा आणि दानवेंच्या विरोधात आंदोलन सुरु करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. खा. चव्हाण म्हणाले, भाजप नेत्यांच्या डोक्यात सत्तेची नशा गेल्याने ते बेताल वक्तव्ये करत आहेत. तूर खरेदी करून दिलासा देण्याऐवजी ते शेतकऱ्यांना शिवीगाळ करत आहेत. सत्तेची नशा डोक्यात गेल्याने ते वारंवार अवमान करत आहेत. आता शिवीगाळ करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. भाजपला थोडीही लाज असेल तर त्यांनी दानवेंवर कारवाई करावी आणि राज्यातील शेतकऱ्यांची माफी मागावी, अशी मागणीही खा. चव्हाण यांनी केली.
दानवेंची भाषा ‘दानवा’सारखी - अशोक चव्हाण
By admin | Updated: May 12, 2017 03:28 IST