वृत्तपत्र विक्रेत्यांमुळेच लोकशाही जिवंत
By Admin | Updated: May 21, 2016 03:42 IST2016-05-21T03:42:47+5:302016-05-21T03:42:47+5:30
ऊन, वारा, पाऊस आणि दंगलीतही वृत्तपत्र विक्रेत्यांचे हात घराघरांत पोहोचत असतात.

वृत्तपत्र विक्रेत्यांमुळेच लोकशाही जिवंत
ठाणे : ऊन, वारा, पाऊस आणि दंगलीतही वृत्तपत्र विक्रेत्यांचे हात घराघरांत पोहोचत असतात. त्यांच्यामुळेच अशा आणीबाणीच्या परिस्थितीत लोकशाही खऱ्या अर्थाने जिवंत राहते, अशा शब्दांत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वृत्तपत्र विक्रे त्यांचा गौरव केला. काळ बिकट आहे. त्यामुळे सर्वच वृत्तपत्र विके्रत्यांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन ठाणे जिल्हा वृत्तपत्र विक्रे ता संघाचे अध्यक्ष कैलास म्हापदी यांनी केले.
ठाणे जिल्हा वृत्तपत्र विक्रे ता संघाच्या १७ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कौटुंबिक स्नेहसंमेलनावेळी कोपरीच्या राऊत शाळेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्र मात ते बोलत होते. शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, ठामपाचे स्थायी समिती सभापती संजय वाघुले, विरोधी पक्षनेते संजय भोईर, प्रभाग समितीचे सभापती राजर्षी नाईक, ठाणे भाजपाध्यक्ष संदीप लेले, नगरसेविका रुचिता मोरे, रेखा पाटील, वितरक बाजीराव दांगट, पराग दांगट आदी या वेळी उपस्थित होते.
वृत्तपत्र विक्रेत्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सध्या प्रयत्न सुरू असले तरी आणखी काही हात पाठीशी उभे राहिले पाहिजेत, अशी भावनाही आव्हाड यांनी व्यक्त केली.
(प्रतिनिधी)
>वृत्तपत्र विक्रेत्यांच्या गुणवंत मुलांचा सत्कार
या सोहळ््याला ठाणे शहरातील ७०० वृत्तपत्र विक्रे ते कुटुंबीयांसह सहभागी झाले होते. मुंबई, ठाणे, पुणे, कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबईतील वृत्तपत्रविक्रे त्यांच्या संघटनांचे प्रतिनिधीही या वेळी उपस्थित होते. वृत्तपत्र विक्रेत्यांच्या गुणवंत मुलांचा या वेळी सत्कार करण्यात आला. ठाणे जिल्हा वृत्तपत्र विक्रे ता संघाचे सरचिटणीस अजित पाटील, कार्याध्यक्ष राजेश मोरे, उपाध्यक्ष शंकर दुधाणे यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम पार पडला.