भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी दानवे?
By Admin | Updated: January 2, 2015 02:39 IST2015-01-02T02:39:24+5:302015-01-02T02:39:24+5:30
भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी केंद्रीय ग्राहक व्यवहार राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे.

भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी दानवे?
लवकरच नियुक्ती : केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देणार
मुंबई : भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी केंद्रीय ग्राहक व्यवहार राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा गुरूवारी रात्री मुंबईत दाखल झाले असून दानवे आणि शहा यांचा मुक्काम सह्याद्री विश्रामगृहावर आहे.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर पक्षाने या पदासाठी नवीन चेहऱ्याचा शोध सुरू केला. सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख, निलंग्याचे आमदार संभाजी निलंगेकर-पाटील आणि बुलडाणा जिल्ह्यातील आमदार डॉ. संजय कुटे यांची नावे चर्चेत होती. मात्र ही तिन्ही नावे मागे पडून दानवेंचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. दानवे हे दोनवेळा आमदार राहिले. ते खासदार म्हणून चौथ्यांदा निवडून आले आहेत. मुख्यमंत्रीपद ब्राम्हण समाजाकडे गेल्यामुळे मराठा समाजातील दानवे (मराठवाडा) यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद सोपवून सामाजिक आणि विभागीय संतुलन साधले जाईल, असे सुत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)