दानवे भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी !
By Admin | Updated: December 31, 2014 10:03 IST2014-12-31T02:32:12+5:302014-12-31T10:03:13+5:30
भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्षपदी केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची लवकरच नियुक्ती होण्याची शक्यता आहे.

दानवे भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी !
लवकरच नियुक्ती : केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देणार
मुंबई : भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्षपदी केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची लवकरच नियुक्ती होण्याची शक्यता आहे. एक व्यक्ती एक पद, या पक्षाच्या नियमानुसार ते मंत्रिपदाचा राजीनामा देतील, असे सूत्रांनी सांगितले.
सध्याचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर पक्षाने अध्यक्षपदासाठी नवीन चेहऱ्याचा शोध सुरू केला होता. सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख, निलंग्याचे आमदार संभाजी निलंगेकर-पाटील आणि बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोदचे आमदार डॉ. संजय कुटे यांची नावे चर्चेत होती. मात्र ही तिन्ही नावे विविध कारणांनी मागे
पडून दानवे यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे.