मुंबई : एसटी कामगार संघटना आणि एसटी प्रशासन यांच्यातील वाद चिघळल्याने ऐन दिवाळीतच सोमवारी मध्यरात्रीपासून महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट संघटनेने (मान्यताप्राप्त) संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, ही संघटनेची प्रमुख मागणी आहे. यामुळे दिवाळीच्या सणातच एसटी प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे.मान्यताप्राप्त संघटनेसह महाराष्ट्र मोटार कामगार फेडरेशन, विदर्भ एसटी कामगार संघटना आणि महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) या संघटनेने संपाला पाठिंबा दिला आहे. मान्यताप्राप्त संघटनेने घेतलेल्या मतदानामध्ये कामगारांनी संप करण्याच्या बाजूने मतदान केले. यानुसार, सोमवारी मध्यरात्रीपासून संपावर जाण्याचा निर्णय मान्यताप्राप्त संघटनेतर्फे घेण्यात आला आहे.संयुक्त कृती समितीचा विरोधमहाराष्ट्र एसटी कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीने संपाला विरोध दर्शविला आहे. लातूरच्या कामगार न्यायालयाने संपाला २६ आॅक्टोबरपर्यंत स्थगिती दिली आहे. या स्थगितीला मुंबई औद्योगिक न्यायालयात आव्हान देण्याची प्रक्रिया सुरू आहे. संपाची नोटीस प्रशासनाला देण्यात आली आहे. परिणामी, संप करणार असल्याचे मान्यताप्राप्त संघटनेनेकडून सांगण्यात आले आहे.संप होणारच !लातूर कामगार न्यायालयाच्या निकालाचा आदर करून मुंबई औद्योगिक न्यायालयात निकालाला आव्हान देण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. एसटी कर्मचारी यांचे श्रम आणि त्या बदल्यात मिळणारा मोबादला हा कमी आहे, हे न्यायालयाने मान्य केले आहे. त्यामुळे राज्यभर संप होणारच.- संदीप शिंदे, अध्यक्ष, स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनाएसटी तेथे संपराज्यात रोज १६ हजार बस रस्त्यावर धावतात. या बसमधून सुमारे ६५ लाख प्रवासी रोज प्रवास करतात. खेडोपाडी अतिदुर्गम भागातदेखील एसटीची सेवा पोहोचत आहे. ‘गाव तेथे एसटी आणि एसटी तेथे संप’, असा पवित्रा मान्यताप्राप्त संघटनेने घेतला आहे.दिवाळीत संप नको- दिवाकर रावतेकर्मचाºयांच्या सर्व मागण्यांबाबत सरकार गंभीर आहे. त्या सोडवण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. करार तातडीने करण्यासाठी आग्रह धरणारा मी महामंडळाचा पहिला अध्यक्ष आहे. त्यामुळे कर्मचाºयांनी दिवाळीसारख्या सणाच्या काळात संपावर जाऊ नये, असे आवाहन एसटीचे अध्यक्ष आणि परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केले आहे.
एसटी कामगारांचा आज मध्यरात्रीपासून संप, सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 05:28 IST