शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

वेगळ्या विदर्भाची मागणी ही फक्त चार जिल्ह्यांपुरतीच- शरद पवार 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2018 9:42 PM

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि देशाच्या राजकारणातील एक वजनदार नेते शरद पवार यांची विशेष मुलाखत घेतली.

पुणे- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि देशाच्या राजकारणातील एक वजनदार नेते शरद पवार यांची विशेष मुलाखत घेतली. मुरब्बी पवार आणि रोखठोक राज यांच्यामध्ये मुलाखतीदरम्यान चांगलीच जुगलबंदी रंगली होती. याच मुलाखतीत राज ठाकरेंनी वेगळ्या विदर्भावर पवारांची भूमिका जाणून घेतली.वसंतराव नाईक, सुधाकराव नाईक, कन्नमवार असे तीन मुख्यमंत्री झाले असतानाही वेगळ्या विदर्भाची मागणी का होते ?, असा प्रश्न राज यांनी उपस्थित केला होता. त्याला शरद पवारांनीही रोखठोक उत्तर दिलं आहे. विदर्भ हा पूर्वी हिंदी भाषक मध्य प्रदेशचा भाग होता. वेगळ्या विदर्भाची मागणी ही फक्त चार जिल्ह्यांपुरतीच मर्यादित होती. वेगळ्या विदर्भाच्या चळवळीचं नेतृत्व हे हिंदी भाषकांकडे गेल्यानंतरच या मागणीनं जोर धरला होता. परंतु सामान्य मराठी माणूस वेगळ्या विदर्भाच्या बाजूने नाही, असं शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे. वसंतराव नाईक यांच्यापासून ते देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत विदर्भातून इतके मुख्यमंत्री झाले तरी वेगळ्या विदर्भाची मागणी कशी होते या राज यांच्या प्रश्नावर पवार म्हणाले, वेगळा विर्भ मागणारा मूलत: मराठी माणूस नाही, अन्य भाषक आहे. वेगळ्या राज्याचे नेतृत्व आपल्याकडे येऊ शकते, असे मानणारे अन्य भाषक वेगळ्या विदर्भाची मागणी करत आहेत. सामान्य माणूस मनापासून त्याचा पुरस्कर्ता नाही. ज्या कोणाला वेगळा विदर्भ हवा असेल त्यांनी लोकमताच्या माध्यमातून तो घ्यावा. पण लोकमत घ्यायला ते तयार नाहीत, असंही पवार म्हणाले आहेत. 

पवारांच्या राजकीय कारकीर्दीला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्तानं जागतिक मराठी अकादमी आणि बीव्हीजी ग्रुप यांनी शोध मराठी मनाचा या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी प्रसिद्ध हास्यकवी रामदास फुटाणे यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं. राजकारणातल्या दोन पिढ्यांचा मेळ घालणारी ही मुलाखत ऐकण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. पुण्यातल्या बीएमसीसी महाविद्यालयात हा कार्यक्रम पडला आहे. कोरेगाव-भीमा हिंसाचारामुळे 3 जानेवारीला नियोजित मुलाखतीचा हा कार्यक्रम रद्द केला होता. तो कार्यक्रम आज 21 फेब्रुवारीला पुण्यातल्या बीएमसीसी महाविद्यालयात पार पडला आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारRaj Thackerayराज ठाकरे