शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

‘वसंतदादा’च्या कामगारांचा एल्गार,उद्यापासून बेमुदत उपोषण, ४७ कामगारांना सेवेत घेण्यासह गुन्हे मागे घेण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2017 14:47 IST

वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याकडील ४७ कामगारांना दत्त इंडिया कंपनीने सेवेत घेतले नाही. तसेच संघटनेवर  घातलेले सर्व गुन्हे मागे घ्यावेत यासह २० मागण्यांसाठी वसंतदादा कारखान्यातील सर्व कामगार दि. २५ डिसेंबरपासून कारखाना गेटसमोर बेमुदत उपोषणाला बसणार

सांगली : वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याकडील ४७ कामगारांना दत्त इंडिया कंपनीने सेवेत घेतले नाही. तसेच संघटनेवर  घातलेले सर्व गुन्हे मागे घ्यावेत यासह २० मागण्यांसाठी वसंतदादा कारखान्यातील सर्व कामगार दि. २५ डिसेंबरपासून कारखाना गेटसमोर बेमुदत उपोषणाला बसणार आहेत, अशी माहिती साखर कामगार युनियन (इंटक) चे जनरल सेके्रटरी प्रदीप शिंदे यांनी दिली.ते पुढे म्हणाले की, वसंतदादा कारखाना खासगी कंपनीस चालविण्यास देण्यासह विविध घडामोडींत एक पाऊल मागे घेऊन कारखाना प्रशासन आणि संचालक मंडळाला सहकार्य केले, तरीही कामगारांचा छळ चालूच आहे. म्हणूनच आंदोलनाचे रणशिंग फुंकावे लागले आहे. संघटनेवर नाहक गुन्हे दाखल केले असून, ते सर्व मागे घेण्याची आमची मागणी आहे. दि. १ जुलै २०१७ पासून ५३ कामगार सेवानिवृत्त झाले आहेत. या कर्मचाºयांना ग्रॅच्युईटीची रक्कम  त्वरित मिळाली पाहिजे. सेवेतील ४७ कामगारांना दत्त इंडिया कंपनीने सेवेतच घेतले नसल्यामुळे त्या कामगारांच्या कुटुंबीयांची उपासमार होत आहे. या कामगारांना त्वरित कामावर घेतले पाहिजे. कारखान्याकडील सेवेत असणाºया कर्मचाºयांचे सप्टेंबर ते आॅक्टोबर २०१७ या कालावधीतील पगार मिळाला पाहिजे. वारंवार मागणी करूनही तो पगार दिला जात नाही. कारखान्याकडे कर्मचाºयांची थकीत रकमा असून, त्या देण्याचे दत्त इंडिया कंपनीने मान्य करूनही देण्यास टाळाटाळ होत आहे. कर्मचाºयांनी गरज म्हणून कमी पगारावरही काम करण्याची तयारी दर्शविली आहे. एवढे सहकार्य करुनही कारखाना व्यवस्थापनाकडून कामगारांचा मानसिक छळ केला जात आहे. व्यवस्थित बोलले जात नाही. कारखान्याचा काटा बंद पाडला शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आणि गुन्हा दाखल केला साखर कामगार युनियनच्या पदाधिकाºयांवर. अशापध्दतीने प्रत्येकाचा छळ कारखाना पदाधिकाºयांकडून चालू आहे, असा आरोप प्रदीप शिंदे यांनी केला. कारखाना प्रशासनाच्या या धोरणाचा निषेध करण्यासाठी दि. २५ डिसेंबरपासून कारखाना गेटसमोरच बेमुदत उपोषणाला बसणार आहे. यातूनही तोडगा निघाला नाही, तर   दि. १ जानेवारीपासून सर्व कामगार बेमुदत संपावर जातील, असा इशाराही त्यांनी दिला.कामगारांना गुलामगिरीप्रमाणे वागणूककामगारांच्या घामावर कारखाना उभा राहिला असतानाही सध्या वसंतदादा कारखान्याचे पदाधिकारी व कंपनीचे अधिकारी कामगारांना गुलामगिरीप्रमाणे वागणूक देत आहेत. कामगारांचा होणारा छळ आम्ही कदापी सहन करणार नाही, असा इशाराही प्रदीप शिंदे यांनी दिला.

टॅग्स :Sangliसांगली