शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

भाजपा सरकारने मांडल्या विक्रमी २०,३२६ कोटींच्या पुरवणी मागण्या

By अतुल कुलकर्णी | Updated: November 20, 2018 03:44 IST

हजारो कोटींच्या पुरवणी मागण्या मांडण्याचा विक्रम भाजपा शिवसेना सरकारने कायम ठेवला असून, हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी तब्बल २०,३२६ कोटींच्या पुरवणी मागण्या विधानसभेत मांडण्यात आल्या.

मुंबई : हजारो कोटींच्या पुरवणी मागण्या मांडण्याचा विक्रम भाजपा शिवसेना सरकारने कायम ठेवला असून, हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी तब्बल २०,३२६ कोटींच्या पुरवणी मागण्या विधानसभेत मांडण्यात आल्या. यात विविध पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत भूसंपादन, पुनर्वसन व सिंचन प्रकल्पांच्या बांधकामाची बिले देण्यासाठी सगळ्यात जास्तम्हणजे तब्बल ३ हजार कोटींच्या तरतुदीचा समावेश आहे.मार्चमध्ये सरकारने ३ लाख ३८ हजार ८१९ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता. त्यानंतर, पावसाळी अधिवेशनात ११ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मांडल्या होत्या. भाजपा शिवसेनाचा कार्यकाळ आॅक्टोबर, २०१९ला संपणार आहे. त्यामुळे मार्च, २०१९ला पूर्ण अर्थसंकल्प मांडता येणार नाही आणि मांडला तरी त्याचा वापर पाच महिन्यांपेक्षा जास्त काळ करता येणार नाही, म्हणून या हिवाळीअधिवेशनात जास्तीतजास्त निधी देण्याचे नियोजन केल्याचे एका नेत्याने स्पष्ट केले.मदतीसाठी २,२०० कोटीखरीपात दुष्काळ घोषित केल्यामुळे मदतीचे वाटप करण्यासाठी २२०० कोटी, महावितरण कंपनीच्या कृषी व यंत्रमागधारक ग्राहकांना देण्यात येणाऱ्या सवलतीपोटी २००० कोटी, हायब्रीड अ‍ॅन्युईटी अंतर्गत रस्त्यांच्या बांधकामांसाठी १,५०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. लघू, मध्यम व मोठ्या उद्योगांना सामूहिक प्रोत्साहन योजनेंतर्गत १,००० कोटी, इतर मागासवर्गातील विद्यार्थ्यांच्यामॅट्रिकेतर शिष्यवृत्तीसाठी ७०० कोटी, सहकारी संस्थांसाठीच्या अटल अर्थसाहाय्य योजनेसाठी५०० कोटी, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेसाठी ४२५ कोटी, नगरपरिषदांना विविध कामांसाठी ३२० कोटी अशा तरतुदी केल्या आहेत.अर्थसंकल्पाच्या नियोजनाचा अभाव, विभागांवर मंत्र्यांचे, सचिवांचे दुर्लक्ष यामुळे पुरवणी मागण्या वाढतात, असा आक्षेप विरोधी पक्षात असताना भाजपाचे नेते करत होते. मात्र, सत्तेवर आल्यानंतर भाजपाला आपल्या बोलण्याचा विसर पडला आहे.- राधाकृष्ण विखे पाटील, विरोधी पक्षनेतेकागदावर आकडे दाखवायचे आणि प्रत्यक्षात कामांना कात्री लावायची, ही जनतेची फसवणूक आहे. मार्च २००९ मध्ये आणखी एकदा पुरवणी मागण्या मांडण्याची संधी वित्तमंत्री सोडतील, असे वाटत नाही. - जयंत पाटील, माजी वित्तमंत्रीकाँग्रेस, राष्टÑवादीने यापेक्षा जास्त मागण्या मांडल्या होत्या. आम्ही दुष्काळावर मात व शेतकºयांनामदत करण्यासाठी कटिबद्ध आहोत. म्हणून या मागण्या आहेत. - सुधीर मुनगंटीवार, वित्तमंत्री.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभा