डी कंपनीच्या नावाने नागपुरात खंडणीची मागणी

By Admin | Updated: May 13, 2016 19:09 IST2016-05-13T19:09:35+5:302016-05-13T19:09:35+5:30

डी कंपनीचा रसिद बोलतो असे सांगून नागपुरातील एका उद्योजकाला खंडणीची मागणी करण्यात आली.

Demand for ransom in Nagpur by the name of D company | डी कंपनीच्या नावाने नागपुरात खंडणीची मागणी

डी कंपनीच्या नावाने नागपुरात खंडणीची मागणी

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 13- डी कंपनीचा रसिद बोलतो असे सांगून नागपुरातील एका उद्योजकाला खंडणीची मागणी करण्यात आली. खंडणी न दिल्यास गंभीर परिणामाची धमकीही देण्यात आली. कार्तिक एकनाथ शेंडे (वय ४२) असे तक्रारकर्त्या उध्योजकांचे नाव आहे. ते पाचपावलीतील हनुमान सोसायटी, वैशालीनगर येथे राहतात. त्यांचा दंत मंजनचा उद्योग आहे.
बुधवारी रात्री सव्वा दहा ते ११.१०च्या सुमारास त्यांच्या मोबाईल क्रमांकाच्या मोबाईलवरून फोन आला. मै डी कंपनी हैदराबादसे बोल रहा हूं. तुझे तेरे बच्चे की फीक्र नही क्या, असे म्हणून त्याने शेंडे यांना शिवीगाळ केली. त्यानंतर कार्तिक यांचे भाऊ सुदर्शन यांच्या मोबाईलवर फोन करून ह्य ये विठोबा दंत मंजन का नंबर है क्या, मै डी कंपनी हैदराबादसे रसिद बोल रहा हूं. तुम्हारा भाई मेरी बात नही सून रहा. मेरो को चंदा चाहिये. मतलब डोनेशन चाहिये,ह्णअसे म्हणत शिवीगाळ केली. खंडणी न दिल्यास गंभीर परिणाम होतील, अशी धमकीही दिली. रसिदचा खंडणीसाठी तगादा वाढल्याने शेंडे यांनी पाचपावली ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Web Title: Demand for ransom in Nagpur by the name of D company