नागराज मंजुळे यांना संरक्षण देण्याची मागणी

By Admin | Updated: May 17, 2016 05:44 IST2016-05-17T05:44:13+5:302016-05-17T05:44:13+5:30

नागराज मंजुळे यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. त्यांना पोलिसांनी संरक्षण पुरवावे, या मागणीसाठी जनशक्ती संघटनेने सोमवारी आझाद मैदानात उपोषण केले.

Demand for protection of Nagraj Manjule | नागराज मंजुळे यांना संरक्षण देण्याची मागणी

नागराज मंजुळे यांना संरक्षण देण्याची मागणी


मुंबई : दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. त्यांना पोलिसांनी संरक्षण पुरवावे, या मागणीसाठी जनशक्ती संघटनेने सोमवारी आझाद मैदानात उपोषण केले.
संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, मंजुळे यांना खंडणीसाठी धमकी देणारे पत्र आले आहे. त्यासंदर्भातील तक्रारही मंजुळे यांनी केली. शिवाय जातीयवादावर सडकून टीका केल्याने मंजुळे यांच्याविरोधात सोशल मीडियावरही आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केल्या जात आहेत. त्यांच्या जिवाला धोका असल्याचे स्पष्ट दिसत आहे. तरीही मंजुळे यांनी संरक्षण मागितलेले नाही, त्यामुळे पोलिसांनी त्यांना संरक्षण देण्याची गरज असल्याचे मत संघटनेने व्यक्त केले आहे.
उपोषणकर्त्यांची मागणी ऐकून घेत पोलिसांनी या प्रकरणी चौकशी करून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे बेमुदत काळासाठी पुकारलेले उपोषण मागे घेण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे.

Web Title: Demand for protection of Nagraj Manjule