‘घोडावत’च्या फुलांना जगभरातून मागणी

By Admin | Updated: February 10, 2017 21:26 IST2017-02-10T21:26:22+5:302017-02-10T21:26:22+5:30

‘व्हॅलेंटाईन डे’ : तीस लाख गुलाब निर्यात होणार

The demand from 'horse' flowers from around the world | ‘घोडावत’च्या फुलांना जगभरातून मागणी

‘घोडावत’च्या फुलांना जगभरातून मागणी

जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील घोडावत अ‍ॅग्रोच्या ग्रीन हाऊसमधून यावर्षी २५ ते ३० लाख फुले ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने देश-विदेशात जाणार आहेत. घोडावत उद्योग समूहाच्या स्टार ग्रीन हाऊसने उत्पादित केलेली आकर्षक गुलाब फुले देश व विदेशातील गुलाबप्रेमींना भुरळ घालणार आहेत. फुलांच्या निर्यातीतून परकीय चलन महाराष्ट्राला मिळणार आहे, अशी माहिती घोडावत अ‍ॅग्रोचे मुख्य कार्यकारी अधिकारी व संचालक अनिल कोटेचा यांनी दिली.
संजय घोडावत, नीता घोडावत यांचे मार्गदर्शन व श्रेणिक घोडावत यांच्या उत्कृष्ट नियोजनाखाली यावर्षी व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने गुलाब फुले देश व विदेशातील बाजारपेठेत पाठविली जाणार आहेत. त्यामध्ये परकीय बाजारपेठेमध्ये जपान, यु. के., ग्रीस, दुबई, हॉलंड, आदींचा समावेश आहे. तसेच देशांतर्गत असलेल्या दिल्ली, मुंबई, हैदराबाद, पुणे, विजयवाडा, इंदौर तसेच गोवा या मोठ्या शहरांतील बाजारपेठांचा समावेश आहे. घोडावत अ‍ॅग्रोच्या फुलांना बाजारात चांगली मागणी असल्याने यापैकी सुमारे १४ ते १५ लाख लाल गुलाब फुले उर्वरित इतर रंगाची फुले देश-विदेशात बाजारपेठेत पाठविली जाणार आहे. जागतिक दर्जाचे स्वयंचलित तंत्रज्ञान, कुशल व अनुभवी कर्मचारी आणि कामगार, गरजेनुसार आवश्यक असलेली सर्व कामे वेळेत पूर्ण करणे, उत्पादन दरम्यान व उत्पादन पश्चात कार्यशिलता, नेटके वाहतूक नियोजन या सर्व उत्कृष्ट संयोजनामुळे घोडावत अ‍ॅग्रोने देश-विदेशातील ग्राहकांचा विश्वास संपादित केला आहे.
कृषी औद्योगिक व व्यापार क्षेत्रातील संजय घोडावत यांचा प्रदीर्घ अनुभव या प्रकल्पास लाभला आहे. त्यांच्यासमेवत नीता घोडावत व प्रकल्पाचे कार्यकारी संचालक श्रेणिक घोडावत यांच्या अभ्यासूवृत्तीने केलेले नियोजन व कामगारांचे लाभलेले सहकार्य या सर्वांच्या सांघिक सहकार्यामुळे घोडावत अ‍ॅग्रोच्या उत्पादनाला वाढती मागणी असल्याचे कोटेचा यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: The demand from 'horse' flowers from around the world