शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

बुलेट ट्रेनच्या विरोधासाठी मनसेने घातले थेट राष्ट्रपतींना साकडे, पत्र पाठवून बुलेट ट्रेन रद्द करण्याची केली मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 16:49 IST

विरोध डावलूनही जिल्ह्यात बुलेट ट्रेनच्या सर्व्हेचे काम जोमाने सुरु आहे. त्यामुळे आता या ट्रेनच्या विरोधात मनसेने थेट देशाच्या राष्ट्रपतींना साकडे घातले आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातून ५० हजार पत्र पाठविली जाणारआधी अंतर्गत रेल्वे व्यवस्था मजबुत करण्याची केली मागणी

ठाणे - बुलेट ट्रेनचा विरोध दिवसेंदिवस वाढत असतांना आता महाराष्ट्र नविनर्माण सेनेने थेट भारताच्या राष्ट्रपतींना साकडे घातले आहे. महाराष्ट्रात हा प्रकल्प नको यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी थेट राष्ट्रपतींना पत्र पाठवले आहे. ठाण्यातील दमाणी इस्टेट येथील पोस्ट आॅफिसबाहेर पत्रपेटीमध्ये रांग लावून पत्र पोस्ट केले. ठाण्यातून राष्ट्रपतींना ५० हजारांपेक्षा जास्त पत्र पाठवून महाराष्ट्रात हा प्रकल्प नको अशी विनंती त्यांना करण्यात येणार असून यासाठी रेल्वे स्थानक आणि बसस्थाकावर ठिकठिकाणी स्टॉल लावण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिली आहे.           मुंबई ते अहमदाबाद दरम्यान धावणाऱ्या बुलेट ट्रेनला महाराष्ट्र नविनर्माण सेनेचा आधीपासूनच विरोध दर्शवला आहे. ठाणे जिल्ह्यात देखील या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात जमीन संपादित करण्यात येत असून जिल्ह्यात सुरु असलेल्या सर्व्हेला देखील यापूर्वी मनसेच्या वतीने विरोध करण्यात आला आहे. मनसेचा विरोध डावलून शासनाच्या वतीने मोजणीचे काम सुरूच असल्याने अखेर राष्ट्रपतींना याबाबत मनसेच्या वतीने साकडे घालण्यात आले आहे. राष्ट्रपतींना दिलेल्या पत्रामध्ये त्यांनी बुलेट ट्रेन आणण्यापेक्षा आहे त्या रेल्वेचा विकास करण्याची विनंती केली आहे. देशातील १२५ करोड जनता अंतर्गत रेल्वेवर अवलंबून आहे. मात्र मूठभर श्रीमंत लोकांसाठी बुलेट ट्रेनचा प्रकल्प राबवला जात आहे. दरवर्षी अपघातामध्ये हजारो नागरीक मरण पावतात. तर काही नागरिकांना कायमचे अपंगत्व येते. मुंबईमध्ये तर रेल्वेचा प्रवास अतिशय जीवघेणा झाला आहे. आपल्या पत्रामध्ये त्यांनी उत्तर प्रदेशचे देखील उदाहरण दिले आहे. उत्तर प्रदेशमध्ये एका ठिकाणी रेल्वे फाटक नसल्यामुळे काही शाळकरी मुलांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यामुळे अंतर्गत रेल्वेमध्ये सुधारणा करण्याच्या ऐवजी काही श्रीमंत लोकांसाठी बुलेट ट्रेनवर करोडो रु पये खर्च करणे कितपत योग्य आहे असा सवाल या पत्रामध्ये मनसेच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे.        देशाच्या अनेक भागांमध्ये अजूनही रेल्वे सेवा पोहचलेली नाही. त्यामुळे आधी ही अंतर्गत रेल्वे सेवा सुधारावी आणि बुलेट ट्रेनचा प्रकल्प रद्द करावा अशी मागणी आम्ही पत्रामध्ये केली असल्याची माहिती जाधव यांनी दिली. राष्ट्रपती हे कोणत्याही पक्षाचे नसतात. त्यामुळे आम्ही त्यांना हा प्रकल्प नको म्हणून पत्र पाठवत आहोत. अजूनही ५० हजार पत्र पाठवण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शासन याबाबत काही ठोस पावले उचलत नसले तरी मनसे बुलेट ट्रेनला कायम विरोध करत राहणार असल्याचेही त्यांनी शेवटी स्पष्ट केले. 

टॅग्स :thaneठाणेMNSमनसेrailwayरेल्वे