मुंबई - कर्मवीर भाऊराव पाटील यांनी घेतलेल्या परिश्रमामुळेच बहुजन समाजाच्या अनेक पिढ्या ज्ञानाच्या प्रकाशात उजळून निघाल्या. त्यांच्या या कार्याची दखल घेत कर्मवीर भाऊराव पाटील यांना मरणोत्तर भारतरत्न प्रदान करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.संपूर्ण महाराष्ट्राला कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कामाविषयी नितांत आदर आहे. मात्र शासन दरबारी त्यांच्या या कार्याची दखल घेतलेली नाही. जयंत पाटील यांनी याप्रकरणी पंतप्रधान मोदी यांना पत्र पाठविले आहे. तसेच केंद्राकडे शिफारस करावी, अशी मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले आहे.
‘कर्मवीर भाऊराव पाटील यांना ‘भारतरत्न’ द्या’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 05:27 IST