शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

डेल्टा प्लस व्हेरियंट ही कोरोनाची तिसरी लाट ठरू नये! इंटरनल मेडिसिन एक्स्पर्ट डॉ. तुषार राणे यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2021 07:33 IST

डेल्टा हा कोरोना विषाणूचा जनुकीय बदल झाल्यामुळे तयार झालेला प्रकार आहे.

मुंबई : देशात कोरोना संक्रमणाची दुसरी लाट ओसरत असतानाच कोरोना विषाणूच्या डेल्टा प्लस व्हेरियंटने धुमाकूळ घातला आहे. विषाणूच्या बदललेल्या स्वरुपामुळे देशाला कोरोना संक्रमणाच्या तिसऱ्या लाटेला सामोरे जावे लागू शकते. परंतु, कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून लसीकरण सुरू आहे. मास्क लावणे, दिवसातून अनेकवेळा २० सेकंद हात धुणे, अंतर राखणे, परिसर निर्जंतुकीकरण करणे; अशी काळजी प्रत्येकानी घ्यायला हवी. डेल्टा प्लस व्हेरियंट कोरोनाची तिसरी लाट ठरू नये, ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी असल्याचे मत इंटरनल मेडिसिन एक्स्पर्ट डॉ. तुषार राणे यांनी व्यक्त केले.

डेल्टा प्लस व्हेरियंट म्हणजे काय?डेल्टा हा कोरोना विषाणूचा जनुकीय बदल झाल्यामुळे तयार झालेला प्रकार आहे. या विषाणूमध्ये असे बदल नियमित होत असतात. त्याची संसर्गक्षमता आता अधिक वाढली आहे. डेल्टा प्लस हा व्हेरियंट अधिक संसर्गजन्य आहे. त्यामुळे आजाराची लक्षणे चार ते पाच दिवसात दिसू लागतात. हा विषाणू फुफ्फुसाच्या पेशींच्या रिसेप्टरला अधिक घट्टपणे चिकटून राहतो. ज्यामुळे फुफ्फुसांना लवकर प्रभाव होण्याची शक्यता असते.

लस डेल्टा प्लस व्हेरियंटवर प्रभावी ठरेल?कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन डेल्टा व्हेरियंटचा शरिरावर होणारा प्रभाव रोखू शकतात. मात्र, या लसींमुळे शरिरात तयार होणाऱ्या अँटिबॉडीज टायटर्सचे प्रमाण किती आहे, हे सध्या तपासून पाहिले जात आहे. मात्र, लस घेतली तर विषाणूचा प्रादुर्भाव कमी होतो आणि प्रसारही रोखला जातो, हे आता सिद्ध झाले आहे. त्यामुळे अनेक लोक विषाणूच्या प्रादुर्भावापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी लसीकरण करून घेऊ लागले आहेत.

कुठे या आजाराचे रूग्ण आढळून आले आहेत का?डेल्टा प्लस व्हेरियंट भारतासह जगभरातील ८० देशांमध्ये आढळून आला आहे. अमेरिका, ब्रिटन, पोर्तुगाल, स्वित्झर्लंड, जपान, पोलंड, नेपाळ, चीन आणि रशिया यांचा यात समावेश आहे. महाराष्ट्रात डेल्टाचा धोका दिवसेंदिवस वाढतो आहे. हा धोका वाढू नये, यासाठी नागरिकांनी योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. कोरोनाची दुसरी लाट अद्याप ओसरेलेली नाही. मात्र, असे असतानाही लोक सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू लागले आहेत. केरळ, महाराष्ट्र, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये या आजाराचे रूग्ण आढळले आहेत.

डेल्टा प्लस व्हेरियंटवर अँटिबॉडी काॅकटेल थेरपी फायदेशीर ठरेल?कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या रूग्णांसाठी अँटिबॉडी कॉकटेल थेरपी उपचारांना भारतात मंजुरी देण्यात आली आहे. लक्षणे दिसून आल्यानंतर पुढील सात ते दहा दिवसांत ही थेरपी फायदेशीर ठरू शकते. कासिरिविमॅब आणि इम्डेविमॅब यासारख्या औषधांना मान्यता देण्यात आली आहे.\

अँण्टीबाँडी काँकटेल थेरपी म्हणजे काय ?मोनोक्लोनल अँटीबॉडी कॉकटेल ही थेरपी अनेक वर्षांपासून कर्करूग्णांवर उपचार करण्यासाठी वापरली जात आहे. या थेरपीमुळे अनेक रूग्णांमध्ये चांगले परिणाम दिसून आले आहे. मोनोक्लोनल अँटीबॉडी हे कोरोनाशी लढण्यासाठी प्लाझ्मामधून काढलेले आहे. रुग्णांना कासिरिविमॅब (६०० एमजी) आणि इम्डेविमॅब (६०० एमजी) या दोन्ही औषधांचे गुण असलेले औषध दिले जाते. हे औषध इंजेक्शनद्वारे दिले जाते. अँटीबॉडी कॉकटेलची संपूर्ण डोस ३० मिनिटांत  दिली जाते. त्यानंतर एक तास रूग्णांना देखरेखीखाली ठेवण्यात येते.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस