अजंता एक्सप्रेसमध्ये महिलेची प्रसूती

By Admin | Updated: October 31, 2016 18:14 IST2016-10-31T18:14:34+5:302016-10-31T18:14:34+5:30

अजंता एक्सप्रेसमध्ये एका महिलेची प्रसूती झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. अजंता एक्स्प्रेसने परिवारासह मनमाडहून पूर्णा येथे जात असताना

Delivery of woman in Ajanta Express | अजंता एक्सप्रेसमध्ये महिलेची प्रसूती

अजंता एक्सप्रेसमध्ये महिलेची प्रसूती

ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 31 -  अजंता एक्सप्रेसमध्ये एका महिलेची प्रसूती झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली.  अजंता एक्स्प्रेसने आपल्या परिवारासह मनमाडहून पूर्णा येथे जात असताना एका महिलेला परसोडा रेल्वे स्टेशननंतर प्रसूती वेदना सुरु झाल्या. ही रेल्वे लासूर स्टेशन येथे  रात्री 10  वाजून 10 मिनिटांनी दाखल झाली.

यावेळी सोबत असलेल्या कुटूंबियानी ही परिस्थिती रेल्वे कर्मचाऱ्यांना सांगितली, परंतू 10.30 वाजेपर्यंत  कोणतीही मदत मिळाली नाही. याविषयी माहिती मिळताच रेल्वे प्रवासी सेनेचे अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी यांनी धाव घेतली. तरी मदतीअभावी रेल्वे पुढे रवाना झाली. दरम्यान, औरंगाबाद स्टेशन येईपर्यंत प्रसूती झाली, विशेष म्हणजे यासाठी प्रवाशांनी केलेल्या सहकार्यासोबतच   तृतीयपंथीयांनीही  सहकार्य केले . या महिलेने मुलीस जन्म दिला. औरंगाबाद स्टेशन येथून त्यांना घाटी रुग्णालयात हलविले, अशी माहिती सोमाणी यांनी दिली.

Web Title: Delivery of woman in Ajanta Express

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.