दैवाने दिले, घालवले: डॉ.रजनीश धेडियांची व्यथा

By Admin | Updated: October 18, 2016 03:28 IST2016-10-18T03:28:09+5:302016-10-18T03:28:09+5:30

डॉ. रजनिश महादया धेडिया या तीस वर्षीय युवकाची इचलकरंजी येथे वैद्यकीय अधिकारीपदी नियुक्ती झाली

Delivered, Delayed: Dr. Rajneesh Dhadia's Soreness | दैवाने दिले, घालवले: डॉ.रजनीश धेडियांची व्यथा

दैवाने दिले, घालवले: डॉ.रजनीश धेडियांची व्यथा

अनिरुद्ध पाटील,

डहाणू / बोर्डी- तलासरी तालुक्यातील वेवजी गावचा डॉ. रजनिश महादया धेडिया या तीस वर्षीय युवकाची इचलकरंजी येथे वैद्यकीय अधिकारीपदी नियुक्ती झाली. नोकरीवर हजर राहण्यासाठी स्वारगेट बसस्थानकातून १२ आॅक्टोबरच्या रात्री बसने प्रवासाकरिता निघाला होता. या वेळी प्रवसा दरम्यान लॅपटॉप, शैक्षणिक कागदपत्र आणि सामानाची बॅग अज्ञात व्यक्तीने चोरली आहे. या बाबत रजनिश यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्र ार दाखल केली असून गहाळ सामान सापडलेले नाही. त्यामुळे धेडिया कुटुंबियांवर संकट ओढावले आहे.
पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्याच्या वेवजी गावात महाराष्ट्र गुजरात सीमेवरील दुर्गम आदिवासी कुटुंबात रजनिश महादया धेडिया राहतो. घरच्या हलाखीच्या परिस्थितीवर जिद्द आणि कठोर प्रयत्नाने मात करून एमबीबीएस आणि एमडीपर्यंतचे शिक्षण घेतले. या करिता अनेकवर्ष कुटुंबापासून लांब वसतिगृहात काढली. त्यानंतर कोल्हापूर येथील इचलकरंजीत वैद्यकीय अधिकारीपदी नियुक्ती झाली. मात्र फार काळ आनंद टिकला नाही. १२ आॅक्टोबर रोजी रात्रीच्या वेळेस स्वारगेटहून इचलकरंजीकडे बसने प्रवासा दरम्यान लॅपटॉप, शैक्षणिक कागदपत्र आणि सामान ठेवलेली बॅग अज्ञात व्यक्तीने चोरली. रजनिश याने तत्काळ स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मात्र गहाळ सामान सापडलेले नाही. त्यामुळे नोकरीचा प्रश्न निर्माण झाल्याने तलासरी येथील त्याच्या कुटुंबियांवर दु:खाचे सावट आहे. दुर्गम आदिवासी गावातल्या सामान्य घरातील मुलाने डॉक्टर होणे आजही अवघड गोष्ट आहे.सोशल मीडियाचे माध्यम आणि लोकमत बातमीतून कागदपत्र मिळविण्यात सहाय्य मिळेल असा विश्वास रजनिश, त्याचा भाऊ नितिन आणि धेडिया कुटुंबियांनी व्यक्त केला आहे.
>कठोर प्रयत्नाने मात करून शिक्षण घेतले. नोकरीकरिता रुजू होण्यासाठी जात असताना प्रवासादरम्यान लॅपटॉपसह, शैक्षणिक कागदपत्र आणि समानाची चोरी झाली आहे. सामान सापडणे अत्यंत आवश्यक आहे. - रजनिश धेडिया (तक्र ारदार)

Web Title: Delivered, Delayed: Dr. Rajneesh Dhadia's Soreness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.