शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

"एकाकी पडल्यामुळे भ्रमिष्ट अवस्थेत",  हसन मुश्रीफांचा जितेंद्र आव्हाडांवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2023 13:38 IST

यांनाच सगळं कळतंय का? असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांचा एकेरी शब्दात उल्लेख करत हसन मुश्रीफ यांनी निशाणा साधला.

Maharashtra Politics ( Marathi News ) : मुंबई : राष्ट्रवादीमध्ये फुट पडल्यानंतर आता अजित पवार गटाचे नेते हसन मुश्रीफ आणि शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड या दोघांमध्येही वाकयुद्ध रंगल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपासोबत जाण्यावरून जितेंद्र आव्हाड यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर टीका केली होती. त्या टीकेला प्रत्युत्तर देताना यांनाच सगळं कळतंय का? असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांचा एकेरी शब्दात उल्लेख करत हसन मुश्रीफ यांनी निशाणा साधला.

जितेंद्र आव्हाडांना पक्षात कोणी विचारत नाहीत. ते एकाकी पडल्यामुळे भ्रमिष्ट अवस्थेत आहेत. आमची सत्ता पहिल्यांदा गेली, तेव्हा भाजपा आणि शिंदे यांच्यासोबत जावं, यासाठी जितेंद्र आव्हाड यांनी पुढाकार घेतला होता. त्यावेळी आमदारांनी सह्या केल्या होत्या, त्यामध्ये जितेंद्र आव्हाड यांची सही एक नंबरला होती, असा दावाही हसन मुश्रीफ यांनी केला आहे. तसेच, आम्ही भाजपसोबत जाणार त्यावेळीच्या चर्चेत जितेंद्र आव्हाड नव्हतेच. माझा भाजपसोबत जायच्या निर्णयाला विरोध असता तर मी मंत्रीपदाची शपथ घेतली असती का? असा सवालही हसन मुश्रीफ यांनी यावेळी उपस्थित केला.

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?जितेंद्र आव्हड यांनी हसन मुश्रीफांवर निशाणा साधला होता. जितेंद्र आव्हाड म्हणाले की, हसन मुश्रीफ यांना विचारा कोणत्या तीन पक्षात भांडण लावण्याच काम केले. हसन मुश्रीफ यांच्यासोबत मी दहा मिनिटं तरी कधी बोललो असेल तर त्यांनी सांगावे, जेव्हा भाजपासोबत जाण्याचा हे विचार करत असतांना या हसन मुश्रीफ यांनी सर्वात आधी मला कॉल केला होता. जितेंद्र  हे थांबवायला हवं, बोलायला आणि काढायला गेलो तर मी पण खूप काढू शकतो." दरम्यान, जितेंद्र आव्हाड आणि हसन मुश्रीफ यांच्यात याआधीही आरोप-प्रत्यारोप झाले आहेत. गद्दारी ही काही लोकांच्या रक्तातच असते, अशा शब्दांत जितेंद्र आव्हाडांनी याआधी हसन मुश्रीफांना उद्देशून टीका केली होती. 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडHasan Mushrifहसन मुश्रीफPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेस