नागपूरात दिल्लीच्या तरुणीची पर्स हिसकावून नेली

By Admin | Updated: July 19, 2016 15:34 IST2016-07-19T15:34:31+5:302016-07-19T15:34:31+5:30

नातेवाईकाला भेटण्यासाठी आलेल्या दिल्लीतील एका व्यापा-याच्या मुलीची पर्स दुचाकीवरील दोन लुटारूंनी हिसकावून नेली. सीताबर्डीतील हॉटेल द्वारकासमोर

Delhi woman grabbed purse purse in Nagpur | नागपूरात दिल्लीच्या तरुणीची पर्स हिसकावून नेली

नागपूरात दिल्लीच्या तरुणीची पर्स हिसकावून नेली

ऑनवाइन लोकमत

नागपूर, दि. 19 -  नातेवाईकाला भेटण्यासाठी आलेल्या दिल्लीतील एका व्यापा-याच्या मुलीची पर्स दुचाकीवरील दोन लुटारूंनी हिसकावून नेली. सीताबर्डीतील हॉटेल द्वारकासमोर सोमवारी रात्री १०.४५ वाजता ही घटना घडली. पर्समध्ये रोख रक्कम आणि मोबाईल असा ६५ हजारांचा ऐवज होता.
दिल्लीच्या करोलबागमध्ये राहणारे श्रीश्यामलाल भानोका हे आपल्या परिवारासह छत्तीसगडमधील नातेवाईकांना भेटण्यासाठी गेले होते. तेथून ते नागपुरात परतले. सीताबर्डी मार्केटमधील हॉटेल द्वारका येथे ते मुक्कामी थांबले होते. येथे नातेवाईकाची भेट घेतल्यानंतर शुक्रवारी रात्री त्यांनी सीताबर्डीतीलच एका हॉटेलमध्ये जेवण घेतले. त्यानंतर ते आणि त्यांची मुलगी बबिता (वय २६) हॉटेल द्वारकामध्ये परतले. हॉटेलच्या प्रवेशद्वाराकडे जात असतानाच दुचाकीवर आलेल्या दोनपैकी एका लुटारूने बबितांच्या हातातील पर्स हिसकावून पळ काढला. पर्समध्ये ५० हजार रुपये आणि १५ हजार किंमतीचा मोबाईल होता. हॉटेलच्या कर्मचा-यांच्या लक्षात हा प्रकार येईपर्यंत आरोपी सुसाट वेगाने पळून गेले. माहिती कळताच सीताबर्डी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरातून आरोपींची छायाचित्रे बघितली. बबितांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील आरोपींचा माग काढला. मात्र, मंगळवार दुपारपर्यंत या प्रकरणातील आरोपींचा छडा लागला नव्हता.

Web Title: Delhi woman grabbed purse purse in Nagpur