शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

आमदार संजय गायकवाड अडचणीत; काँग्रेसने दिल्ली पोलिसात दाखल केली तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2024 11:32 IST

शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे

MLA Sanjay Gaikwad : शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.  काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी संजय गायकवाड यांच्याविरोधात दिल्लीत तक्रार करण्यात आली आहे. दिल्लीतल्या तुघलक रोड पोलीस ठाण्यात काँग्रेसने आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. केंद्रीय मंत्री रवनीत बिट्टू यांच्यासह संजय गायकवाड यांच्याविरोधात ही तक्रार दाखल झाली आहे. काँग्रेस नेते अजय माकन यांनी ही तक्रार  दिली.

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी परदेशात असताना आरक्षणासंदर्भात एक विधान केले होते. त्या वक्तव्यानंतर आमदार संजय गायकवाड यांनी टीका केली होती. राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्याला ११ लाखांचे बक्षीस देणार असल्याचे विधान संजय गायकवाड यांनी केले होते. गायकवाड यांच्या या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांच्याविरोधात टीका केली होती. त्यानंतर आता काँग्रेसने दिल्लीत आमदार गायकवाड यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. काँग्रेसचे उपाध्यक्ष अजय माकन यांनी एनडीएच्या चार नेत्यांविरोधात दिल्लीच्या तुघलक रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यामध्ये आमदार संजय गायकवाड यांच्यासह दोन केंद्रीय मंत्र्यांचाही समावेश आहे.

काय म्हणाले संजय गायकवाड?

बुलढाणा येथील पत्रकार परिषदेत बोलताना आमदार संदय गायकवाड यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली होती. "काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला आहे. राहुल गांधी यांचं वक्तव्य हा जनतेचा सर्वात मोठा विश्वासघात आहे. राहुल गांधी हे संविधानाचं पुस्तक दाखवून भाजप ते बदलून टाकेल असं खोटं नरेटिव्ह पसरवतात. पण प्रत्यक्षात देशाला ४०० वर्षे मागे नेण्याची काँग्रेसची योजना आहे. मराठा, धनगर आणि ओबीसी सारखे समाज इथं आरक्षणासाठी लढत आहेत, पण ते देण्याऐवजी राहुल गांधी त्यांचे आरक्षणाचे लाभ संपवण्याची भाषा करत आहेत. त्यांची जीभ कापणाऱ्याला मी ११ लाख रुपये बक्षीस देईन," असं आमदार संजय गायकवाड यांनी म्हटलं होतं.

राहुल गांधींच्या जीभेला चटके द्या - खासदार अनिल बोंडे

संजय गायकवाड यांनी केलेल्या वक्तव्यानंतर आता भाजप खासदार अनिल बोंडे यांनीही राहुल गांधींविरोधात टीका केली आहे. "संजय गायकवाड यांनी जीभ छाटण्याची केलेली भाषा योग्य नाहीये. परंतु राहुल गांधी आरक्षणासंदर्भात जे बोलले ते अतिशय भयानक आहे. विदेशात जाऊन वात्रटासारखं कोणी बोलत असेल तर त्यांची ‘जीभ छाटू नये जिभेला चटके मात्र दिले पाहिजे’ अशा लोकांच्या जिभेला चटके देणे आवश्यक आहे," अशी टीका अनिल बोंडे यांनी केली आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीSanjay Gaikwadसंजय गायकवाडBJPभाजपाcongressकाँग्रेस