शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Delhi Election Results: भविष्यात नरेंद्र मोदींना पर्याय कोण?, शिवसेना म्हणते...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 13:03 IST

दिल्ली निवडणुकीचे कल हाती आल्यानंतर आता मोदींना पर्याय कोण याची चर्चा सुरू झाली आहे.

ठळक मुद्देदिल्ली निवडणुकीचे कल हाती आल्यानंतर आता मोदींना पर्याय कोण याची चर्चा सुरू झाली आहे. आपला नाकारण्याचं दिल्लीकरांना मोदींनी केलेलं आवाहन जनतेनं झिडकारलं आहे. शिवसेनेचे नेते आणि मंत्री अनिल परब यांना मोदींना भविष्यात पर्याय कोण असं विचारलं असता सूचक विधान केलं आहे. 

नवी दिल्ली- दिल्ली निवडणुकीचे कल हाती आल्यानंतर आता मोदींना पर्याय कोण याची चर्चा सुरू झाली आहे. आपला नाकारण्याचं दिल्लीकरांना मोदींनी केलेलं आवाहन जनतेनं झिडकारलं आहे. त्यानंतर शिवसेनेनंही भाजपाला कोंडीत पकडण्याची संधी साधली आहे. शिवसेनेचे नेते आणि मंत्री अनिल परब यांना मोदींना भविष्यात पर्याय कोण असं विचारलं असता सूचक विधान केलं आहे. मोदींना पर्याय कोण असेल ते काळ आणि वेळच ठरवेल. शिवसेनेनं पर्याय दिला आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी उद्धव ठाकरे विराजमान झाले. तसाच देशाचा पर्यायदेखील कदाचित शिवसेना ठरवेल.पुढच्या निवडणुकीत आणखी चित्र स्पष्ट होईल. लोकसभा निवडणुकीत देशाचा कल समजेल. निवडणुकांमधूनच लोकांचं कौल मिळत असतो. त्याचा कौल आता मिळालेला आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान लोकांच्या मनात काय आहे, हे मतपेटीतून दिसेल. राजकारणात ओहोटी आणि भरती सुरूच असते. आपच्या विकासावरती दिल्लीकरांनी विश्वास दाखवलेला आहे. परंतु सदा न् कदा आम्हीच राज्य करू, आमच्याशिवाय कोणीच राज्य करू शकत नाही हा जो अहंकार असतो. तो लोक कधी ना कधी तरी उतरवतात. मोदींना पर्याय कोण असेल ते काळ आणि वेळच ठरवेल. शिवसेनेनं पर्याय दिला आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी उद्धव ठाकरे विराजमान झाले. तसाच देशाचा पर्यायदेखील शिवसेना ठरवेल. पुढच्या निवडणुकीत आणखी चित्र स्पष्ट होईल. लोकसभा निवडणुकीत देशाचा कल समजेल. आपच्या विकासावरती दिल्लीकरांनी विश्वास दाखवलेला आहे, असंही अनिल परब म्हणाले आहेत.तसेच मोदींच्या देशद्रोह्यांसंदर्भातील विधानाचा हवाला देत शिवसेनेनं त्यावर भाष्य केलं आहे. देशद्रोहाची व्याख्या काय हे सर्वात महत्त्वाचं असून, ते लोकांनी मान्यसुद्धा करायला पाहिजे. एका व्यक्तीनं देशद्रोहाची व्याख्या करणं म्हणजे ती देशद्रोहाची व्याख्या होत नाही. लोकांनादेखील ती मान्य असावी लागते. लोकांना काय मान्य आहे ते लोकांनी दाखवून दिलं आहे. महाराष्ट्रात जे सत्तापरिवर्तन झालेलं आहे, त्याचा परिणाम दिल्लीत दिसतो आहे.देशाच्या राजकारणाला शिवसेनेनं वेगळं वळण दिलं आहे. त्या वळणाचे परिणाम हळूहळू दिसायला लागले आहेत. दिल्लीत आपची सत्ता उलथवण्यासाठी केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे, तर संपूर्ण देशातून भाजपाचे दिग्गज नेते उतरवले गेले होते. एवढे सगळे दिग्गज नेते उतरवल्यानंतरही दिल्लीसारख्या छोट्या प्रदेशावर ते आपला कब्जा करू शकलेले नाहीत. जिंकू शकलेले नाहीत. यातच सगळ्या पुढच्या भविष्याची दिशा दिसते आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीdelhi electionदिल्ली निवडणूकShiv SenaशिवसेनाAnil Parabअनिल परब