शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाने जिजाऊ-शिवरायांच्या स्वप्नाचा चुराडा केला, अरविंद केजरीवाल यांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2018 16:17 IST

शिक्षीत झाल्याशिवाय राष्ट्रनिर्माण होऊ शकत नाही.मात्र महाराष्ट्रातील फडणवीस सरकार जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचा घाट घालत आहे. जे सरकार शाळा चालवू शकत नाही ते सरकार काय चालवणार.

सिंदखेड राजा (बुलडाणा) : शिक्षीत झाल्याशिवाय राष्ट्रनिर्माण होऊ शकत नाही.मात्र महाराष्ट्रातील फडणवीस सरकार जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचा घाट घालत आहे. जे सरकार शाळा चालवू शकत नाही ते सरकार काय चालवणार. त्यांना फक्त मलाई खायला पाहिजे, अशा शब्दात आम आदमी पक्षाचे संयोजक तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी येथे भाजप सरकारवर टीकेची तोफ डागली.

राष्ट्रमाता माँ जिजाऊंच्या ४२० व्या जन्मोत्सवाच्या अनुषंगाने आम आदमी पक्षाच्या वतीने मातृतिर्थ सिंदखेड राजा येथे आयोजित संकल्प सभेत ते बोलत होते. जातीयवादाच्या राजकारणामुळे आज महाराष्ट्राचे नुकसान होत आहे. सध्याच्या भाजप सरकराने हेच केले असून माँ जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रिबाई फुले आणि महात्मा फुले यांची स्वप्ने शाळा बंद करून त्यांचा भंग केला आहे, असे केजरीवाल पुढे बोलताना म्हणाले. तीन वर्षांपासून दिल्लीत आम आदमी पक्षाचे सरकार आहे. तेथे शाळांचा कायापालट आम्ही केला असून ३०० नवीन शाळा निर्माण केल्या आहेत. दिल्लीतील सरकारी शाळांमध्ये स्वीमिंग पूल, जिम, हाँकी मैदाने निर्माण केली आहेत. अन्य शाळांच्या तुलनेत दहा टक्के  निकालही या सुविधांमुळे वाढला आहे. ख-या अर्थाने आम आदमी पक्षाच्या दिल्ली सरकारने माँ जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वप्न पूर्ण केले असल्याचा दावा त्यांनी केला. ४० हजार करोडचे बजेट दिल्ली सरकारचे आहे. ते जर सरकारी शाळा चालवू शकते तर तीन लाख करोडचे बजेट असलेल्या महाराष्ट्राला सरकारी शाळा चालवणे का जमू नये. कारण त्यांना पैसा खायचा आहे. महाराष्ट्रात सध्या घोटाळे समोर येत आहेत. दिल्लीत जनतेने अर्थात रयतेने काँग्रेस, भाजपलाही सत्तेतून दूर हाकलून सामान्य मानसाचे अरथात आम आदमीची सत्ता प्रस्तापीत केली. त्यामुळेच मोफत आरोग्य सुविधा, देशात सर्वात स्वस्त वीज दिल्लीमध्ये उपलब्ध करून देऊ शकलो असेही केजरीवाल म्हणाले.

भाजप हा दंगेखोरांचा पक्ष-भारतीय जनता पक्ष हा दंगेखोरांचा पक्ष आहे. देशद्रोही, गद्दारांचा या पक्षात समावेश आहे. पाकिस्तान गत ७० वर्षांपासून भारतात अराजक माजविण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु, त्या देशाला जे ७० वर्षांत जमले नाही, ते भाजप सरकारने तीन वर्षांच्या कार्यकाळात करून दाखविले. या सरकारच्या काळात देशात अराजकता माजली असून, जातीय दंगली वाढल्या आहेत, असा आरोप केजरीवाल यांनी केला. कोरेगाव भीमा येथील घटनेचा संदर्भ देताना ‘जातीय दंगली घडवा आणि राज्य करा’ हेच धोरण या सरकारचे असल्याची टीका केजरीवाल यांनी केली. यावेळी त्यांनी कोरेगाव भीमा घटनेचा जाहीर निषेधही केला.

या कार्यक्रमास दिल्लीचे मंत्री राजेंद्र गौतम, आम आदमी पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रिती शरमा मेनन, सिंचन घोटाळा काढणारे विजय पांढरे, राहूल चव्हाण, देवेंद्र वानखेडे, ब्रिगेडीयर सुधीर सावंत, बुलडाणा जिल्हा प्रभारी संयोजक सुनील मोरे, लक्ष्मण कोल्हे, अनिल पटेल, अजिंक्य शिंदे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालbuldhanaबुलडाणाSindkhed Rajaसिंदखेड राजाBJPभाजपा