शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

काँग्रेसचा घोळ पाहून उद्धव ठाकरे हताश, एका वाक्यात मांडली उद्विग्नता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2020 13:26 IST

काही खात्यांसाठी अजूनही आग्रह; मंत्री, राज्यमंत्री अस्वस्थ

मुंबई : महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन आता पाच दिवस उलटले असले, तरी अद्याप खातेवाटप मात्र झालेले नाही. काही खात्यांबाबत काँग्रेस नेते अद्यापही आग्रही असल्याने हे खातेवाटप रखडल्याची माहिती आहे. मात्र, लांबत चाललेल्या या खातेवाटपामुळे काँग्रेस कार्यकर्ते संतापले असल्याचे समजते. इतके दिवस खातेवाटप रेंगाळल्यामुळे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही अस्वस्थता आहे.मंत्री व राज्यमंत्र्यांना आपल्याला कोणते खाते मिळणार, हे समजू शकलेले नाही. खात्याविना मंत्रालयात बसायचे कसे, लोकांना भेटायचे कसे, कोणत्या अधिकाऱ्यांसह बैठका घ्यायच्या आणि त्यांना सूचना तरी काय द्यायच्या, असा प्रश्न या मंत्री आणि राज्यमंत्र्यांना पडला आहे.शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांची महाविकास आघाडी सत्तेवर येण्यापूर्वीच तिन्ही पक्षांकडे कोणती खाती असतील, हे निश्चत झाले आहे. खातेवाटप झालेले आहे. त्यामुळेच काँग्रेसकडे कोणती खाती असतील, याची माहिती प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, सरचिटणीस के. सी. वणुगोपाल यांना आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या समक्ष हे खातेवाटप झाले होते. असे असताना काँग्रेसचे मंत्री दुसºया खात्यासाठी का आग्रही आहेत? असा सवाल उपस्थित केला जात आहे.शिवसेनेने मात्र अतिशय सामंजस्याची भूमिका घेत, त्यांच्या वाट्याला आलेली सांस्कृतिक कार्य व बंदरे विकास ही दोन खाती काँग्रेस पक्षाला देण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र, तरीही काँग्रेस नेते आणखी काही खात्यांसाठी आग्रही असल्याची माहिती आहे. गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ‘आता कुठे तरी हे थांबवा,’ अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केल्याचे समजते.मात्र, मंत्रिमंडळ बैठकीत वादावादी झाल्याचे वृत्त उपमुख्यमंत्री अजित पवार व कॅबिनेट मंत्री अशोक चव्हाण यांनी फेटाळून लावले आहे.ज्यांचे आमदार जास्त त्यांचा पालकमंत्रीज्या जिल्ह्यात ज्या पक्षाचे आमदार जास्त आहेत, त्यांना संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री देण्यात येणार आहे. मात्र काही जिल्ह्यांबाबत निर्णय बाकी आहे. लवकरच खाते वाटप होईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘लोकमत’ला दिली.

टॅग्स :congressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाBJPभाजपा