९४ टक्के प्रवेश निश्चित
By Admin | Updated: June 23, 2015 03:03 IST2015-06-23T03:03:09+5:302015-06-23T03:03:09+5:30
अकरावी प्रवेशासाठीच्या पहिल्याच आॅनलाइन कट आॅफ लिस्टमध्ये ९३.८ टक्के विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. ५०,८८८ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे कॉलेज मिळाले,

९४ टक्के प्रवेश निश्चित
मुंबई : अकरावी प्रवेशासाठीच्या पहिल्याच आॅनलाइन कट आॅफ लिस्टमध्ये ९३.८ टक्के विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. ५०,८८८ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे कॉलेज मिळाले, असे शिक्षण उपसंचालक भीमराव फडतरे यांनी सांगितले.
अकरावी प्रवेशाच्या अद्याप दोन आॅनलाइन कट आॅफ जाहीर होणे बाकी आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अकरावी आॅनलाइनसाठी एकूण २ लाख ६४९ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यातील १ लाख ८८ हजार १५८ विद्यार्थ्यांचे प्रवेश पहिल्याच यादीत निश्चित झाले आहेत; तर उर्वरित विद्यार्थ्यांचे प्रवेश दुसऱ्या यादीत निश्चित होण्याची शक्यता आहे.