शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मावर बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
2
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
3
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
4
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
5
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
6
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
7
भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर काँग्रेस खासदाराचे मोठे वक्तव्य, पीएम मोदींना केली 'ही' मागणी...
8
भारतीय सैन्यानं उडवली दाणादाण, आता पाकिस्तान सैन्य करतंय कचरा साफ! पाक एअरबेसवर सध्या परिस्थिती काय? 
9
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स
10
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
11
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
12
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
13
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
14
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
15
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
16
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
17
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
18
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
19
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
20
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही

अवैध बांधकामाचा बचाव :शिंदे, चव्हाण यांना हायकोर्टाचा टोला  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 04:54 IST

आपल्या मतदारसंघातील बेकायदा बांधकामावरील कारवाई थांबविण्यासाठी केंद्रीय मंत्र्याने मुख्यमंत्र्यांकडे जाणे अपेक्षित नाही व मुख्यमंत्र्यांनी अशी स्थगिती देणे योग्य नाही, असे न्या. भूषण गवई व न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने म्हटले.

मुंबई : सोलापुरातील एका सभागृहाचे कथित अनधिकृत बांधकाम पाडण्याची कारवाई महापालिकेने सुरू केल्यावर त्यावेळी केंद्रीय मंत्री असलेले सुशीलकुमार शिंदे ते प्रकरण घेऊन स्वत: तत्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे गेले व मुख्यमंत्र्यांनी त्या कारवाईस स्थगिती दिली, असे निदर्शनास आल्यावर बड्या राजकीय नेत्यांकडून असे वर्तन अपेक्षित नाही, असा टोला मुंबई उच्च न्यायालायाने गुरुवारी लगावला.आपल्या मतदारसंघातील बेकायदा बांधकामावरील कारवाई थांबविण्यासाठी केंद्रीय मंत्र्याने मुख्यमंत्र्यांकडे जाणे अपेक्षित नाही व मुख्यमंत्र्यांनी अशी स्थगिती देणे योग्य नाही, असे न्या. भूषण गवई व न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने म्हटले. सुशील सभागृहाच्या मालकाने बांधकाम नियमाधीन करण्याचा अर्ज मागे घेतला आहे व कारवाईवरील स्थगितीही उठविण्यात आली, असे न्यायालयास सांगण्यात आले. तसेच कारवाईचे आश्वासन महापालिकेने दिले. त्यामुळे न्यायालायने हे बांधकाम पाडण्याचे निर्देश दिले. सोलापूर येथील ‘सुशील सभागृहा’चे उद््घाटन स्वत: सुशीलकुमार शिंदे यानी सन १९९१ मध्ये केले होते. मात्र त्यानंतर हे सभागृह बेकायदा वाढविण्यात आले असा दावा करणारी व या बेकायदा बांधकामावर कारवाई करावी, अशी मागणी करणारी याचिका विजयकुमार महागावकर यांनी केली आहे.याचिकेनुसार, सोलापूर पालिकेने बेकायदा बांधकामांविरुद्ध मोहीम हाती घेतली. संबंधितांना नोटीस बजावली. त्यात सुशील सभागृहाचा समावेश होता. मात्र या सभागृहावर कारवाईआधीच सुशील सभागृहाच्या मालकांनी तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर खुद्द शिंदे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन या बांधकामावरील कारवाईस स्थगिती मिळवली.शिंदे यांनी फाईल दिल्याचा शेराशिंदे यांनी स्वत: ही फाईल दिल्याचा शेरा चव्हाण यांनी फाईलवर मारल्याचे उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आल्यावर न्यायालयाने याबाबत नाराजी व्यक्त केली. तर शिंदे यांच्या वकिलांनी सांगितले की, शिंदे यांची महिन्यातून किमान एकदा मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक असायची. त्या वेळी ही फाईल चव्हाण यांना दिली. ‘सभागृहाच्या मालकाने सभागृहाला पालिकेची परवानगी असल्याचे सांगत कायदेशीर कागदपत्रेही दाखवली. तत्कालीन मुख्यमंत्र्यांना केवळ यात लक्ष घालायला सांगितले,’ असेही शिंदे यांच्या वकिलांनी सांगितले.