शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रकांत खैरे यांचा पराभव हा माझा पराभव - उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2019 12:56 IST

शिवसेनेचा मराठवाड्यातील बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात चंद्रकांत यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

जालना - शिवसेनेचा मराठवाड्यातील बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात चंद्रकांत यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. पक्षाचे ज्येष्ठ नेते असलेल्या चंद्रकांत खैरे यांचा पराभव शिवसेनेच्या जिव्हारी लागला आहे. चंद्रकांत खैरे यांचा झालेला पराभव हा माझा पराभव आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज जालना येथे दिली. दुष्काळग्रस्त भागाची पाहणी  करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी जालना येथे आले आहेत. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राळेगावच्या चारा छावणीला भेट दिली. त्यानंतर एका सभेला संबोधित करताना शिवसेना दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी नेहमी त्यांच्यासोबत राहील, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले. यावेळी लोकसभा निवडणुकीत  चंद्रकांत खैरे यांच्या झालेल्या पराभवाबाबत उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली. चंद्रकांत खैरे यांचा झालेला पराभव हा माझा पराभव आहे, काही झालं तरी औरंगाबाद सोडणार नाही, असे ते म्हणाले.  लोकसभा निवडणुकीतील शिवसेनेच्या यशाबाबत शंका उपस्थित करण्यात येत होत्या. मात्र शिवसेनेचे 18 खासदार निवडून आले. दिल्लीत मला जो काही मानसन्मान मिळत आहे, तो तुमच्यामुळेच मिळत आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी मराठवाडा मुक्तिसंग्रामात सरदार पटेल यांनी दिलेल्या योगदानाचा आधार घेत उद्धव ठाकरे यांनी मोदींना मराठवाड्याची दुष्काळातून मुक्तता करण्याचे आवाहन केले. सरदार वल्लभभाई पटेलांप्रमाणे मोदींनीही मराठवाड्याच्या पाठिशी रहावे, असे ते म्हणाले. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाChandrakant Khaireचंद्रकांत खैरेAurangabadऔरंगाबाद