शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

लोकलमधून पडून जखमी झालेल्या दीपाली ढोमसेला आर्थिक मदतीची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2018 19:42 IST

मोलमजुरी करून तीन मुलींचा सांभाळ करणा-या आईला आर्थिक हातभार लावण्याच्या उद्देशानं घराबाहेर पडलेल्या दीपाली ढोमसेचा लोकलमधून पडून अपघात झाला.

कल्याण- मोलमजुरी करून तीन मुलींचा सांभाळ करणा-या आईला आर्थिक हातभार लावण्याच्या उद्देशानं घराबाहेर पडलेल्या दीपाली ढोमसेचा लोकलमधून पडून अपघात झाला. इंटरव्ह्यू देऊन परतणा-या दीपालीला दिवा-कोपरदरम्यान लोकलमधून पडून झालेल्या अपघातात गंभीर दुखापत झाली. रात्री 9 वाजून 10 मिनिटांनी दिवा-कोपरदरम्यान मोटरमनला रेल्वे ट्रकलगत कुणीतरी पडल्याचे आढळल्यानंतर त्याने दीपालीला लोकलमधून डोंबिवली स्थानकात आणले. येथून तिला रुग्णालयात नेण्यात आले.बेशुद्ध असलेल्या दीपालीच्या मणक्याला फॅक्चर झाले आहे, तसेच छातीला आणि चेह-याला मार लागलाय. तिच्या डाव्या बाजूची हालचालही होत नाहीये. तिने उपचारांना प्रतिसाद देण्यास सुरुवात केली आहे.  मात्र तिच्या कुटुंबाची परिस्थिती हलाखीची असल्यानं रुग्णालयाचं बिल भरण्यासाठीही तिच्याकडे पैसे नाहीत. पैशांशिवाय हॉस्पिटलमधून डिस्चार्ज कसा मिळणार, असा प्रश्न कुटुंबीयांना पडलाय. तीन मुली झाल्यामुळे दीपालीच्या वडिलांनी तिच्या आईला घटस्फोट दिला आहे. त्यामुळे चार घरची धुणीभांडी करून तिची आई तिन्ही मुलींचं पालन-पोषण करते.आपल्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी दहावीची परीक्षा दिल्यानंतर दीपालीनं मैत्रिणीच्या मदतीनं नोकरीचा शोध सुरू केला होता. दीपालीची एक बहीण यंदा दहावीला, तर दुसरी आठवीत आहे. दीपाली आदिशक्ती ढोलताशा पथकाची सदस्य आहे. या अपघातग्रस्त तरुणीवर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, तिची प्रकृती अत्यंत नाजूक आहे. दीपालीवर ओढावलेल्या या संकटातून बाहेर काढण्यासाठी तिला आर्थिक मदत करण्याचे आवाहन आदिशक्ती ढोल पथक प्रमुख प्राजक्ता देशपांडे यांनी केले आहे. ढोलताशा पथक प्रमुख प्राजक्ता देशपांडे यांनी तिला काही प्रमाणात आर्थिक मदत केली असली तरी दानशूर व्यक्तीनं दीपालीला मदतीचा हात द्यावा, असे आवाहन देशपांडे यांनी केले आहे. दीपालीला मदत करायची असल्यास या नंबरवर 9833118716 संपर्क साधा. तसेच दीपालीला शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनीही मदतीचा हात दिलाय. त्यांनी तिच्या औषधांचा सर्व खर्च उचलला असून, तिची तब्येत पूर्णतः स्वस्थ होत नाही, तोपर्यंतचा रुग्णालयासह उपचारांचा खर्च श्रीकांत शिंदे उचलणार आहेत. 

मदतीसाठी प्राजक्ता देशपांडे यांच्या खात्यावरही पैसे जमा करू शकता.Ac no. - 6546038203 Ifsc code. - IDIB000D047Indian bankPrajakta Deshpande