शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

Deepali Chavan Suicide Case: त्रास देताना शिवकुमारने ओलांडल्या सर्व मर्यादा!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2021 3:07 AM

Deepali Chavan Suicide Case: ‘शिवकुमार-रेड्डींच्या मस्तवालपणातून खूनच’

नागपूर : दीपाली चव्हाणने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या करणे हा खून नव्हे, तर उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार आणि मेळघाटचे माजी क्षेत्रसंचालक श्रीनिवास रेड्डी या दोघांच्या मस्तवालपणातून घडलेला खूनच आहे. भविष्यात अशी एकही दीपाली बळी पडू नये, यासाठी या दोघांना कठोरात कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी ‘जस्टिस फॉर दीपाली’च्या मंचावरून माहेर संस्थेच्या अध्यक्ष अरुणा सबाने आणि अ.भा. सत्यशोधक महिला शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी महासंघाच्या अध्यक्ष वंदना वनकर यांनी रविवारी केली.अमरावती, हरिसाल भागाचा दोन दिवसांचा दौरा करून परतल्यावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या म्हणाल्या, शिवकुमारमुळे दीपाली प्रचंड दहशतीत होती. त्याच्या गाडीचा हॉर्न ऐकला तरी आपला बीपी वाढतो, असे ती सांगायची. रात्री-अपरात्री भेटायला बोलावणे, थोडा उशीर झाला तरी ‘साली’ अशी शिवीगाळ करणे, रात्री १२-१ वाजता संकुलावर भेटायला बोलावणे, असे प्रकार तो करायचा. तो दररोज दीपालीच्या कार्यालयात येऊन तिच्या खुर्चीवर बसायचा. सर्व कनिष्ठ सहकाऱ्यांसमोर घाणेरड्या शिव्या द्यायचा. शिवकुमार गेल्यावर त्या रडायच्या. आत्महत्येच्या आदल्या दिवशीही तो कार्यालयात येऊन बरेच काही अपमानजनक बोलून गेल्याचे तिच्या सहकाऱ्यांनी सांगितल्याची माहिती सबाने यांनी दिली. दीपालीच नाही, तर सर्वच कर्मचाऱ्यांशी तो अपमानजनक भाषेत बोलायचा. आपल्यासोबतही शिवकुमारची अशीच वागणूक होती, असे तेथील एका २५ वर्षीय महिला कर्मचाऱ्याने सांगितले. शिवकुमार हा रेड्डीच्या मर्जीतील होता. तक्रारी करूनही त्याने वारंवार दुर्लक्ष केले. यामुळे तोसुद्धा तेवढाच दोषी असल्याचा आरोप सबाने आणि वनकर यांनी केला. दीपालीचे पती आणि दीपाली या दोघांनीही खासदार नवनीत राणा यांना तीन-चार वेळा भेटून तक्रार दिली होती. मदतीची विनंती केली होती. मात्र, त्यांनी मदत केली नाही. आता त्या टीव्हीवर आक्रोश करत असल्या तरी त्यासुद्धा दोषी असल्याचा आरोप वनकर यांनी केला.चौकशी समिती रेड्डीच्या मर्जीतील वनविभागाने स्थापन केलेली चौकशी समितीमधील अनेक अधिकारी  रेड्डीच्या मर्जीतील आहेत. त्यामुळे ती बरखास्त करून नवी समिती स्थापन करावी. फास्ट ट्रॅक कोर्टात प्रकरण चालवावे. विशाखा समिती स्थापन न केल्याबद्दल कायदेशीर कारवाई करावी. या दोन्ही अधिकाऱ्यांवर भादंवि ३०२, ३५४ (अ), ३७६ (क) कलमांचा  समावेश करून खटला चालवावा, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.

टॅग्स :Deepali chavanदीपाली चव्हाण