शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

Deepak Kesarkar Angry on Uddhav Thackeray Speech: एकेदिवशी आमदारांचाही संयम सुटेल; गुवाहाटीतील हॉटेलमध्ये बसून ठाकरेंचे भाषण पाहणारा शिंदे गट संतापला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2022 18:26 IST

शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुलढाण्यातील चिखलीमध्ये शिंदे गटावर खोकेवाले असा आरोप केला. हे भाषण शिंदे गटाचे आमदार, मंत्री देखील गुवाहाटीहून पाहत होते.

शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुलढाण्यातील चिखलीमध्ये शिंदे गटावर खोकेवाले असा आरोप केला. यावर गुवाहाटीच्या हॉटेलमधून त्यांचे भाषण पाहणारे एकनाथ शिंदेंचे आमदार संतापले आहेत. दीपक केसरकर यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. 

अब्दुल सत्तारांना लाथ घालून हाकलून दिले असते, जशी एकाला घातलेली; उद्धव ठाकरे सुप्रिया सुळेंना शिवी घातल्यावरून संतापले

आमच्यावर खोके घेतल्याचा आरोप करताय, बदनामी करताय. एकदिवशी आमदारांचा संयम सुटेल. कायद्यात माफीचा साक्षीदार असतो. मग कळेल कुठे कुठे मोठेच्या मोठे खोके गेले. फ्रीजचा बॉक्स, कार्टुन भरून भरून कुठे काय गेले हे बाहेर पडेल असे प्रत्युत्तर केसरकर यांनी दिले आहे.

उद्धव ठाकरेंनी 'लावला तो ऑडिओ'; देवेंद्र फडणवीसांना दिलं ओपन चॅलेंज

 ज्या अयोध्येला तुम्ही जाता, ती रथयात्रा कोणी अडवली ती माहिती नाही का, ज्याने अडवली त्याच्या पायाशी जाऊन लोटांगन घालता. बदनामी सहन करण्याची मर्यादा असते. आम्हाला तुमच्याबद्दल आदर आहे म्हणून आम्ही अजून बोलत नाही आहोत. दुसऱ्याकडे बोट दाखवतो तेव्हा तुमच्याकडेही इतर बोटे असतात असा इशारा केसरकर यांनी दिला. 

उद्धव ठाकरे काय म्हणाले? खोटे बोलून रेटूने नेले जात आहे. तसेच राज्य चालविले जात आहे. पण आता जनता भोळीभाबडी राहिलेली नाही. मी मुख्यमंत्री असतो तर एकालाही आत्महत्या करावी लागली नसती. आत्महत्या करायची नाही. शिवरायांचे नाव घेतो, त्यांनी लढायला शिकविले होते. एका बाजुने लंडनमधून तलवार आणण्यास सांगायचे आणि दुसरीकडे कोश्यारी त्याच शिवाजी महाराजांविरोधात बोलणार. वेळ पडली तर महाराष्ट्र बंद करून ठेवावा लागणार आहे, असा इशारा ठाकरे यांनी दिला.  

शेतकऱ्यांना कर्जमुक्ती झाली की नाही असं विचारलं होतं. तेव्हा शेतकऱ्याने होय कबुली दिली होती. माझं उघड आव्हान आहे. जेव्हापासून खोके सरकार महाराष्ट्राच्या गादीवर बसलं तेव्हापासून पनवती सुरू झालीय.  मी ४० रेड्यांना, गद्दारांना विचारतोय. आम्ही भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढणार नाही हे जाहीर सांगावं. यांना केवळ नाव बाळासाहेबांचं, चेहरा बाळासाहेबांचा आणि आशीर्वाद मोदींचा तुमची मेहनत कुठे आहे? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेDeepak Kesarkarदीपक केसरकर Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना