शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

शिवशाहीच्या अपघातात घट : एसटी महामंडळाचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 3:49 PM

शिवशाही बस सेवेत आल्यापासून अपघाताच्या घटना सातत्याने घडत आहेत. त्यामुळे या बसच्या सुरक्षित प्रवासावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देशिवशाही बसचे अपघाताचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न; उपाययोजनांसाठी समितीवातानुकुलित व आरामदायी शिवशाही बस सेवेला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद ९९८ शिवशाही बसेस असून राज्यातील विविध २७८ मार्गावर दैनंदिन २१३० फेऱ्या

पुणे : अपघाताच्या दुष्टचक्रात सापडलेल्या एसटी महामंडळाच्या शिवशाही बससेवेला अच्छे दिन येत असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. मागील दोन महिन्यांत शिवशाहीच्या अपघातांमध्ये घट तसेच उत्पन्नात देखील वाढ झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. वातानुकुलित व आरामदायी शिवशाही बस सेवेला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. सध्या महामंडळाच्या ताफ्यात ९९८ शिवशाही बसेस असून राज्यातील विविध २७८ मार्गावर दैनंदिन २१३० फेऱ्या करत होत आहे. मात्र, या बस सेवेत आल्यापासून अपघाताच्या घटना सातत्याने घडत आहेत. त्यामुळे या बसच्या सुरक्षित प्रवासावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याबाबत विधीमंडळातही चर्चा झाली. त्यावर परिवहन मंत्री व महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी अपघातांच्या कारणांचा शोध घेऊन उपाययोजना सुचविण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. त्यानुसार महामंडळाने समिती नियुक्त करून अपघातांच्या कारणांचे विश्लेषण करून उपाययोजना सुचविल्या आहेत. त्यानुसार पुण्यातील महामंडळाच्या मध्यवर्ती प्रशिक्षण संस्थेत महामंडळाच्या चालक, यांत्रिकी कर्मचारी, पर्यवेक्षक व अधिकाºयांना थेट बसेस बनविणाºया कंपनीच्या तज्ञांकडून प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणामुळे अपघातांमध्ये घट झाली आहे. एप्रिल ते आॅगस्टदरम्यान दर एक लाख किलोमीटरमागे स्वमालकीच्या शिवशाही बसेसचे अपघाताचे प्रमाण ०. ४१ टक्के होते. सप्टेंबर महिन्यात त्यामध्ये ७ टक्क्यांनी घट झाली. आॅक्टोबरमध्ये हे प्रमाण ०.१८ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. तसेच खाजगी शिवशाही बसचे एप्रिल ते आॅगस्टदरम्यान दर एक लाख किलोमीटरमागे०.३४ टक्के अपघाताचे प्रमाण होते. सप्टेंबर २०१८ मध्ये ते ०.२८ टक्के तर आॅक्टोबर मध्ये ०.२१ टक्क्यांपर्यंत घटले. महामंडळाच्या लांब पल्ल्याच्या बसेसच्या अपघाताचे वार्षिक प्रमाण दर एक लाख किलोमीटर मागे ०.१८ टक्के आहे. त्यापेक्षा शिवशाही बसचे अपघाताचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न असल्याचे महामंडळ प्रशासनाकडून सांगण्यात आले.

टॅग्स :PuneपुणेDiwakar Raoteदिवाकर रावतेShivshahiशिवशाही