शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

साखरेच्या उत्पादनात घट; वापरात वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2020 04:54 IST

गेल्या वर्षातील स्थिती : यंदा पुन्हा अतिरिक्त होण्याची शक्यता

चंद्रकांत कित्तुरे।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जगभरातील साखर उत्पादनात २०१९-२०च्या हंगामात ७७ लाख ४२ हजार टनांनी घट होऊन ते १६६७ लाख ९८ हजार टन झाले आहे. २०१८-१९ मध्ये १७५४ लाख ४० हजार टन उत्पादन झाले होते. याउलट जगातील साखरेचा वापर मात्र २१ लाख ७६ हजार टनांनी वाढून तो १७६० लाख ९६ हजार टन झाला आहे. २०१८-१९ मध्ये तो १७३९ लाख २० हजार टन होता. नव्या साखर हंगामात मात्र साखरेच्या उत्पादनात १०० लाख टनापेक्षा जादा उत्पादन होणार असल्याने साखर अतिरिक्त होण्याची शक्यता आहे.जगभरातील उत्पादन आणि वापर यातील तफावत पाहता २०१९-२० या वर्षात ९२ लाख ९८ हजार टन साखरेचा तुटवडा जाणवला आहे. यामुळेच गतवर्षी आंतरराष्टÑीय बाजारातील साखरेचे दर १३ ते १४ सेंट प्रति पौंड (२४ ते २५ रुपये प्रतिकिलो) पर्यंत गेले होते. गेल्या दोन-तीन वर्षांपासून अतिरिक्त साखरेच्या समस्येला तोंड देणाऱ्या भारतालाही याचा फायदा झाला. भारताची साखर निर्यात ५० लाख टनाहून अधिक झाली आहे. भारतातही या हंगामात साखरेच्या उत्पादनात घट होऊन ते २७० लाख टन झाले आहे. साखरेची मागणी २० लाख टनांनी घटल्यामुळे या वर्षातील साखरेचा वापर २४० लाख टन इतकाच होण्याची शक्यता आहे. परिणामी एक आॅक्टोबरपासून सुरू होणाºया नव्या साखर हंगामाच्या प्रारंभी देशात ११५ लाख टन साखर शिल्लक असणार आहे. चालू वर्षी ब्राझीलने ऊस इथेनॉलकडून पुन्हा साखरेकडे वळविल्याने तेथील साखर उत्पादनात यंदा ७० लाख टनांनी वाढ होणार आहे.ब्राझील पुन्हा अव्वल स्थान पटकावणार?जगातील ११० देशांत साखरेचे उत्पादन होते. गतवर्षी ब्राझीलने ऊस इथेनॉलकडे वळविल्यामुळे भारत साखर उत्पादनात जगात पहिल्या क्रमांकावर गेला होता. यंदा हे स्थान पुन्हा ब्राझील पटकाविण्याची शक्यता आहे. दहा प्रमुख साखर उत्पादक देशांपैकी भारत, ब्राझील, थायलंड, चीन, अमेरिका, मेक्सिको, रशिया, पाकिस्तान, फ्रान्स, आॅस्ट्रेलिया या देशांतच सुमारे ७० टक्के उत्पादन होते. आंतरराष्टÑीय साखर संघटनेचे हे आकडे आहेत.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखाने