दुष्काळावर चर्चैऐवजी पॅकेज जाहीर करा - विरोधकांची मागणी

By Admin | Updated: December 9, 2014 14:02 IST2014-12-09T13:58:20+5:302014-12-09T14:02:22+5:30

दुष्काळप्रश्नावर चर्चा करण्याऐवजी आधी सरकारने पॅकेज जाहीर करावे अशी मागणी काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी विधानसभेत केली आहे.

Declare a package on drought instead of Charta - Opponents demand | दुष्काळावर चर्चैऐवजी पॅकेज जाहीर करा - विरोधकांची मागणी

दुष्काळावर चर्चैऐवजी पॅकेज जाहीर करा - विरोधकांची मागणी

ऑनलाइन लोकमत 

नागपूर, दि.९ - दुष्काळप्रश्नावर विरोधकांनी मंगळवारी आक्रमक पवित्रा घेत चर्चा करण्याऐवजी आधी दुष्काळग्रस्तांसाठी पॅकेज जाहीर करा अशी मागणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी विधानसभेत केली आहे. विरोधकांच्या गोंधळामुळे विधी मंडळाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. 

नागपूरमध्ये सुरु असलेले हिवाळी अधिवेशन सध्या चांगलेच तापले आहे. मंगळवारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी दुष्काळावरुन सरकारवर टीका केली. सरकार दुष्काळाप्रश्नी गंभीर नसून ते फक्त राजकारणातंच मश्गूल आहेत अशी बोचरी टीका दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी केली. तर विरोधकांनीच चर्चा करु दिली नाही असा आरोप शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी केला. 

 

Web Title: Declare a package on drought instead of Charta - Opponents demand