देवळालीच्या 'टी.ए बटालियन' भरतीची ‘फेक पोस्ट’ व्हायरल... तरुणांचे लोंढेच्या-लोंढे लष्कराच्या दारातून पुन्हा आपआपल्या घराकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 22:15 IST2017-10-15T22:10:32+5:302017-10-15T22:15:54+5:30
ऐन दिपावलीच्या तोंडावर लष्कराच्या ११६ बटालीयनमध्ये भरती असल्याबाबतचा संदेश व्हॉटसअपवर फिरल्याने रविवारी हजारो तरुण भरतीसाठी देवळाली कॅम्पमध्ये दाखल झाले आहेत. देवळालीकॅम्प लष्करही हद्दीत असंख्य तरुण भरतीसाठी आल्याची बाब लष्कराला समजल्यानंतर त्यांचीही धावपळ झाली.

देवळालीच्या 'टी.ए बटालियन' भरतीची ‘फेक पोस्ट’ व्हायरल... तरुणांचे लोंढेच्या-लोंढे लष्कराच्या दारातून पुन्हा आपआपल्या घराकडे
नाशिक : येथील देवळाली कॅम्पमधील ११६ इनफंन्ट्रीच्या बटालीयनमध्ये १६ आॅक्टोबर रोजी लष्कर भरती असल्याची पोस्ट सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने देशभरातील हजारो तरुणांनी देवळाली कॅम्प गाठले; मात्र अशाप्रकारची कोणतीही भरती नसल्याची बाब त्यांना कॅम्पमध्ये आल्यावर कळली; अन् देशसेवेची इच्छा तशीच मनात घेऊन शेकडो तरुण लष्कराच्या दारातून पुन्हा आपआपल्या घराकडे परततले.
ऐन दिपावलीच्या तोंडावर लष्कराच्या ११६ बटालीयनमध्ये भरती असल्याबाबतचा संदेश व्हॉटसअपवर फिरल्याने रविवारी हजारो तरुण भरतीसाठी देवळाली कॅम्पमध्ये दाखल झाले आहेत. देवळालीकॅम्प लष्करही हद्दीत असंख्य तरुण भरतीसाठी आल्याची बाब लष्कराला समजल्यानंतर त्यांचीही धावपळ झाली. या संदर्भात त्यांनी काही तरुणांची चौकशी केली असता त्यांना व्हॉटसअपवरील फेक संदेशाची माहिती समजली आणि त्यांनी तत्काळ जिल्हा प्रशासनाला याबाबतची माहिती दिली. लष्कराने बटालीयनमध्ये कोणतीही भरती नसल्याचा फलकही लावल्यानंतर आलेले तरुण निराश होऊन परतले.
भारतीय लष्कराच्या ११६ इंनफंट्री बटालीयन (टि.ए पॅरा) मध्ये १६ आॅक्टोबर रोजी भरती असल्याचा संदेश सोशल मिडियावर फिरत असल्याने देवळाली मध्ये रविवारी दिवसभर युवकांचे लोंढे दाखल होत राहिले.
देशभरातून तसेच महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्हातून शेकडो च्या संखयेने युवक देवळालीत दाखल झाले होते. आधीच दिवाळीच्या खरेदीसाठी देवळालीत नाशिक जिल्हाच्या विविध भागातून ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी असतांना लष्कर भरतीसाठी युवकांची गर्दी झाल्याने देवळालीच्या छावनी परिषदेच्या परिसरात पाय ठेवायला देखील जागा नव्हती. दरम्यान, भरती नसल्याचे समजलज्यानंतर तरुणांनी घरचा रस्ता धरला. कॅम्पमधील खाद्य पदार्थ्यांची दुकाने आणि उपहारगृहामध्ये या युवकांची गर्दी झाल्याचे दिसून आले. दरम्यान, विविध शहरांमधून आलेले हजारो तरूण मिळेल त्या रेल्वेने घराकडे परतण्यासाठी नाशिक रोड रेल्वे स्थानकावर दाखल झाल्याने रेल्वे स्थानक ओसंडून वाहत होते.