पीक कर्जमाफीसाठी काँग्रेसची मुख्यमंत्र्यांपुढे घोषणाबाजी

By Admin | Updated: June 6, 2016 03:31 IST2016-06-06T03:31:53+5:302016-06-06T03:31:53+5:30

शेतकऱ्यांना संपूर्ण पीक कर्जमाफी द्यावी, या मागणीसाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमात प्रचंड घोषणाबाजी केली.

Declaration against Congress Chief Minister for crop loan forgiveness | पीक कर्जमाफीसाठी काँग्रेसची मुख्यमंत्र्यांपुढे घोषणाबाजी

पीक कर्जमाफीसाठी काँग्रेसची मुख्यमंत्र्यांपुढे घोषणाबाजी

यवतमाळ : शेतकऱ्यांना संपूर्ण पीक कर्जमाफी द्यावी, या मागणीसाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमात प्रचंड घोषणाबाजी केली. येथील आर्णी मार्गावरील नगरपरिषद व्यापार संकूल भूमिपूजन प्रसंगी अचानक झालेल्या या आंदोलनामुळे पालकमंत्री संजय राठोड यांना व्यासपीठावरून खाली उतरून आंदोलकांची समजूत घालावी लागली.
काँग्रेसचे शहर अध्यक्ष चंद्रशेखर चौधरी यांच्यासह काही कार्यकर्ते या भूमिपूजन कार्यक्रमाच्या ठिकाणी आले आणि शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या, अशी घोषणाबाजी सुरू झाली. त्यावेळी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमदार मदन येरावार करीत होते.
अचानक सुरू झालेल्या या आंदोलनाने सभास्थळी गोंधळ उडाला. पोलिसांचा बंदोबस्त कार्यक्रमाच्या बाहेर होता. त्यामुळे पालकमंत्री राठोड व्यासपीठावरून खाली उतरले व त्यांनी आंदोलकांना समजाविण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात पोलिसांनी धाव घेत आंदोलकांना ताब्यात घेतले. (प्रतिनिधी)

Web Title: Declaration against Congress Chief Minister for crop loan forgiveness