शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरे पदावरून गेल्यानंतरही निर्णय झाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2022 07:04 IST

Eknath Shinde : आम्ही दीड महिन्यात निर्णयांचा धडाका लावला. शेतकरीहिताचे निर्णय झाले, भंडाऱ्यातील बलात्कार घटनेवर तातडीने कारवाई केली, एसआयटी नेमली, असे शिंदे म्हणाले.

मुंबई : मुख्यमंत्रिपदाचा उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतरही काही आदेश आधीच्या महाविकास आघाडी सरकारने घेतले, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत केला. आधीच्या तारखेत काही निर्णय घेतले गेले असे त्यांनी यानिमित्ताने सूचित केले.

आम्ही जनहिताचे कोणतेही निर्णय थांबवलेले नाहीत; पण घाईगडबडीत, राज्यपालांनी विश्वासदर्शक ठराव मंजूर करण्याचे आदेश दिल्यानंतरही काही निर्णय झाले. त्यांचे पुनरावलोकन आम्हाला करावेच लागेल, असे शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतरही निर्णय झाले असतील तर ते आम्ही तपासायचे नाही का, असा सवाल शिंदे यांनी केला. शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी वापरलेली चिथावणीखोर भाषा आणि आ. संतोष बांगर यांनी सरकारी अधिकाऱ्याला केलेली मारहाण याबाबत विचारले असता शिंदे  म्हणाले, की चुकीच्या वर्तनाचे मी समर्थन करणार नाही. कायदा सगळ्यांसाठी समान आहे. अगदी मलादेखील. काय झाले ते तपासून घेऊ. आम्ही दीड महिन्यात निर्णयांचा धडाका लावला. शेतकरीहिताचे निर्णय झाले, भंडाऱ्यातील बलात्कार घटनेवर तातडीने कारवाई केली, एसआयटी नेमली, असे शिंदे म्हणाले.

भाजपच्या खात्यांना ६० टक्के, शिंदे गटाला ४० टक्के निधी मुख्यमंत्री शिंदे गटाला कमी महत्त्वाची खाती दिली गेली, या आरोपाचा उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रपरिषदेत इन्कार केला. ते म्हणाले की, भाजपचे ११५ आमदार आहेत आणि आमच्या खात्यांना ३ लाख १७ हजार कोटींचा निधी आहे. शिंदे यांचे ५० आमदार आहेत आणि त्यांच्याकडील खात्यांना १ लाख ९७ हजार कोटी रुपयांचा निधी आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेचे ५६ आमदार होते आणि त्यांच्याकडील खात्यांना केवळ १२.८८ टक्के इतकाच निधी होता.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे