शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

राजीनामा देण्याचा निर्णय एकनाथ खडसेंचाच : देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2019 16:08 IST

खडसे याच्यावरील आरोपावरून भाजपची बदनामी होत असल्याची चर्चा भाजप गटात सुरू झाली होती. त्यामुळे खडसे यांना राजीनामा देण्यासाठी पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून दबाव आणला गेला होता. मात्र खडेसेंनी स्वत: राजीनामा दिल्याचा खुलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे

मुंबई - भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे १९९० पासून खडसे विधानसभेवर निवडून जात आहेत. १९९५ ते १९९९ दरम्यानच्या युतीच्या काळात खडसे अर्थमंत्री व पाटबंधारे मंत्री राहिलेले आहे. राज्यातील भाजपच्या पहिल्या फळीतील नेते म्हणून त्यांना समजले जाते.  मात्र तेच खडसे भाजपकडून गेल्या दिवसांपासून उपेक्षीत आहेत.

२०१४ मध्ये युतीचे सरकार मध्ये खडसे यांना मिळालेल्या महसूलसह इतर खात्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर एकनाथ खडसे यांनी अनेकदा नाराजी बोलून दाखवली. मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहिलं, म्हणून अनेकांची झोप उडाली, असे त्यांनी एका कार्यक्रमात बोलवून दाखवले होते. 

एमआयडीसी घोटाळ्या बरोबर अनेक आरोप एकनाथ खडसेंवर करण्यात आले होते. खडसे यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपावरून विरोधकांनी भाजपवर टीका करण्यास सुरवात केली होती. खडसे याच्यावरील आरोपावरून भाजपची बदनामी होत असल्याची चर्चा भाजप गटात सुरू झाली होती. त्यामुळे खडसे यांना राजीनामा देण्यासाठी पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून दबाव आणला गेला होता. मात्र खडेसेंनी स्वत: राजीनामा दिल्याचा खुलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. एकनाथ खडसे आता काय उत्तर देणार याकडे लक्ष लागले आहे. 

काय म्हणाले मुख्यमंत्रीएकनाथ खडसे यांच्यावर एमआयडीसी प्रकरणात जेव्हा आरोप झाले, त्यावेळी विरोधकांनी राळ उठवली होती. विरोधकांना खडसे आणि आम्हीही उत्तर दिले. एकनाथ खडसे त्यावेळी मला येऊन भेटले आणि चौकशी करा तोपर्यंत मी राजीनामा देतो, असे स्वत: म्हणाले होते. पुढे हे प्रकरण न्यायालयात गेले. विचारपूर्वक निर्णय घ्या म्हणून मी त्यांना त्यावेळी सांगितले होते, असा खुलासा सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला बोलताना केला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकEknath Khadaseएकनाथ खडसेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा