शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

गोकुळ मल्टिस्टेट करण्याचा निर्णय सत्ताधारी संचालकांकडून रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2019 15:03 IST

गोकुळचे चेअरमन रवींद्र आपटे यांची प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती

कोल्हापूर : गोकुळ मल्टिस्टेट करण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. गोकुळच्या सत्ताधारी संचालकांनी हा निर्णय घेतला असून त्याबद्दलची माहिती चेअरमन रवींद्र आपटे यांनी दिली. जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (गोकुळ) सर्वसाधारण सभा बुधवारी होणार आहे. त्यापूर्वी हा निर्णय घेण्यात आला. 'गोकुळ'च्या गतवर्षी झालेल्या सर्वसाधारण सभेत मल्टिस्टेटच्या ठरावाला आमदार सतेज पाटील, हसन मुश्रीफ, चंद्रदीप नरके, माजी आमदार संपतराव पवार यांनी विरोध केला. सभेत सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्याने मोठा राडा झाला. याशिवाय चप्पलफेकही झाली. त्यामुळे अवघ्या तीन मिनिटात घाईगडबडीत सभा गुंडाळावी लागली होती. लोकसभेत राष्ट्रवादीला मल्टिस्टेटचा फटका बसला. दूध उत्पादक मल्टिस्टेटच्या विरोधात असतील तर मी त्यांच्यासमवेत अशी भूमिका अरुण डोंगळे यांनी घेतली. पण गोकुळचे नेते पी. एन. पाटील आणि माजी आमदार महादेराव महाडिक यांनी मल्टिस्टेटमुळे दूध संघ खासगी होणार नसून तो दूध उत्पादकांचा राहील, अशी भूमिका घेतली.

लोकसभेप्रमाणे विधानसभेच्या निवडणुकीत कोल्हापूर दक्षिण आणि करवीर विधानसभा मतदारसंघात मल्टिस्टेटचा प्रश्न पुढे आला होता. आता निवडणूक संपल्यानंतर गोकुळची सभा होत आहे. या सभेत मल्टिस्टेटवर विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केला जाण्याची शक्यता होती. या सभेसाठी रणनिती ठरवण्यासाठी आज आमदार सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांची बैठकदेकील बोलावली होती.

टॅग्स :Gokul Milkगोकुळ