शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

महाविद्यालयांचा निर्णय अजूनही गुलदस्त्यातच! ऑनलाइन की ऑफलाइनचा निर्णय आज होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2022 05:57 IST

मुंबईत ओमायक्रॉन बाधितांची संख्या वाढल्याने दहावी, बारावी वगळता शाळांसह, कनिष्ठ महाविद्यालये येत्या ३१ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे राज्यात पुन्हा नव्याने अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता राज्यातील महाविद्यालये सुरू ठेवायची की नाही याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय बुधवारी घेतला जाणार आहे. अशी माहिती उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी दिली. 

  सामंत यांच्या उपस्थितीत मंगळवारी ऑनलाईन बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे. या ऑनलाईन बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विक्सचंद्र रस्तोगी, तंत्र हशिक्षण संचालक अभय वाघ, सर्व अकृषी विद्यापीठांचे कुलगुरू, जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त उपस्थित होते.

मुंबईत ओमायक्रॉन बाधितांची संख्या वाढल्याने दहावी, बारावी वगळता शाळांसह, कनिष्ठ महाविद्यालये येत्या ३१ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर शहरासह राज्यातील विद्यापीठ, महाविद्यालये सुरू ठेवणे कितपत योग्य राहील, याचा अभिप्राय कुलगुरूंनी सादर करावा, अशा सूचना मंत्र्यांनी ३१ डिसेंबर रोजी तातडीने बोलावण्यात आलेल्या बैठकीत दिल्या होत्या. कोरोनाबाधितांच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे सरकारने मंगळवारी तातडीने बैठक बोलावली होती. 

वसतिगृह सुरू करण्याची मागणी, पण ?विद्यापीठ अनुदान आयोगाने भारतातील सर्व विद्यापीठांना आवश्यक काळजी घेऊन वसतिगृहे सुरू करण्याची सूचना केली आहे. मात्र मुंबई विद्यापीठासह राज्यातील अनेक विद्यापीठांना याचा विसर पडला आहे. अशा प्रतिक्रिया विद्यार्थी देत असून वसतिगृह सुरु करण्याची मागणी करीत आहेत. पीएचडी करणाऱ्या तसेच पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृह सुरू नसण्याचा प्रचंड त्रास होत असून यासंदर्भातील निर्णय लवकरात लवकर घ्यावा, अशी मागणी छात्रभारती संघटनेने केली आहे. मात्र सद्यस्थितीत वसतिगृह सुरु करण्यासंबंधातील निर्णय कितपत योग्य असेल यावर शंका उपस्थित होत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस