मुख्यमंत्रीपदाचा निर्णय २८ ऑक्टोबरला

By Admin | Updated: October 26, 2014 18:38 IST2014-10-26T18:35:03+5:302014-10-26T18:38:48+5:30

महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदावर भाजपातर्फे कोणाची वर्णी लागणार याचे उत्तर २८ ऑक्टोबर रोजी भाजपाच्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत मिळणार आहे.

The decision of the Chief Minister will be on 28th October | मुख्यमंत्रीपदाचा निर्णय २८ ऑक्टोबरला

मुख्यमंत्रीपदाचा निर्णय २८ ऑक्टोबरला

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २६ - महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदावर भाजपातर्फे कोणाची वर्णी लागणार याचे उत्तर २८ ऑक्टोबर रोजी भाजपाच्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत मिळणार आहे.  २८ ऑक्टोबररोजी मुंबईत भाजपाच्या विधीमंडळ पक्षाची बैठक होणार असून केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह व जे.पी. नड्डा हे या बैठकीत निरीक्षक म्हणून उपस्थित राहणार आहेत. 
दिवाळी संपताच राज्यातील सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. रविवारी भाजपा नेत्यांनी एकनाथ खडसे यांच्या मुंबईतील निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीत विनोद तावडे, देवेंद्र फडणवीस आदी ज्येष्ठ नेते उपस्थित होते. या बैठकीत सत्ता समीकरणांवर चर्चा झाली. २८ ऑक्टोबरला भाजपाच्या विधीमंडळ पक्षाची बैठक होणार असून या बैठकीत विधीमंडळ नेत्याची निवड होईल व त्यानंतरच मुख्यमंत्रीपदी कोणाची वर्णी लागेल हे स्पष्ट होईल. सकाळी ११ वाजता विधानभवनात ही बैठक होईल अशी माहिती एकनाथ खडसे यांनी दिली. विधीमंडळ नेत्याची निवड झाल्यावर सरकार स्थापनेसाठी राज्यपालांकडे दावा करु असे भाजपा नेत्यांनी सांगितले. शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्यासाठी आम्ही इच्छुक आहोत असे सूचक विधान विनोद तावडे यांनी केले.
मुख्यमंत्रीपदासाठी भाजपामध्ये जोरदार रस्सीखेच सुरु असून देवेंद्र फडणवीस यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याचे समजते. मात्र नितीन गडकरी, एकनाथ खडसे यांनीही मुख्यमंत्रीपदासाठी लॉबिंग सुरु केले आहे.  महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपाला सर्वाधिक १२२ जागांवर विजय मिळाला आहे. भाजपाप्रणीत महायुतीतील मित्रपक्षाला एका जागेवर विजय मिळाल्याने भाजपाचे संख्याबळ १२३ पर्यंत पोहोचले आहे. सत्ता स्थापनेसाठी भाजपाला आणखी २१ आमदारांची गरज आहे. तर शिवसेना ६३ आमदारांसह दुस-या जागेवर आहे. मात्र ४१ आमदार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने यापूर्वीच भाजपाला बाहेरुन पाठिंबा जाहीर केला आहे. 

Web Title: The decision of the Chief Minister will be on 28th October

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.