‘तो’ निर्णय औरंगाबाद अधिवेशनात घेणार - मेटे

By Admin | Updated: October 16, 2016 00:35 IST2016-10-16T00:35:59+5:302016-10-16T00:35:59+5:30

सध्या राज्यातील शिवसेना व भाजपा या दोन सत्ताधारी पक्षांमध्ये श्रेयासाठी लुटूपुटूची लढाई सुरु आहे. अशा परिस्थितीत सरकारमध्ये रहायचे की नाही याचा निर्णय औरंगाबाद

'To decide' will take place in Aurangabad session - Mete | ‘तो’ निर्णय औरंगाबाद अधिवेशनात घेणार - मेटे

‘तो’ निर्णय औरंगाबाद अधिवेशनात घेणार - मेटे

अलिबाग : सध्या राज्यातील शिवसेना व भाजपा या दोन सत्ताधारी पक्षांमध्ये श्रेयासाठी लुटूपुटूची लढाई सुरु आहे. अशा परिस्थितीत सरकारमध्ये रहायचे की नाही याचा निर्णय औरंगाबाद येथे येत्या १३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या शिवसंग्रामच्या अधिवेशनात घेण्यात येणार आहे. याबाबतची माहिती शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक व छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी शनिवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिली आहे. आगामी नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समिती निवडणुकांच्या बाबत शिवसंग्रामची भूमिका या विषयी विचार विनीमय करण्याकरिता येथील संघटनेच्या पदाधिकारी बैठकीकरीता आ. मेटे येथे आले होते. त्याच्या समवेत शिवसंग्रामचे कोकण विभागीय सरचिटणीस अविनाश सांवंत आदि मान्यवर उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: 'To decide' will take place in Aurangabad session - Mete