धानासाठी विकेंद्रित खरेदी योजना

By Admin | Updated: January 6, 2016 02:14 IST2016-01-06T02:14:33+5:302016-01-06T02:14:33+5:30

धान खरेदीसाठी विकेंद्रित खरेदी योजना २०१६-१७ च्या रब्बी व खरीप हंगामापासून संपूर्ण राज्यात राबविण्याचा निर्णय मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

Decentralized purchase scheme for Dhan | धानासाठी विकेंद्रित खरेदी योजना

धानासाठी विकेंद्रित खरेदी योजना

मुंबई : धान खरेदीसाठी विकेंद्रित खरेदी योजना २०१६-१७ च्या रब्बी व खरीप हंगामापासून संपूर्ण राज्यात राबविण्याचा निर्णय मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
विकेंद्रित धान खरेदी योजनेची अंमलबजावणी २०१६-१७ च्या हंगामापासून करण्यात येईल. तथापि, ही योजना राबविण्यासाठी आवश्यक असलेला केंद्र शासनासोबत करावयाचा सामंजस्य करार तसेच जिल्ह्यातील अधिकारी आणि कर्मचारी यांचे प्रशिक्षण आदी प्राथमिक बाबींची पूर्तता या हंगामाअगोदर झाल्यास ही योजना नियोजनाप्रमाणे सुरु करण्यात येईल.
विकेंद्रित खरेदी योजना स्वीकारल्यामुळे धानाची खरेदी होणाऱ्या विभागातील जिल्ह्यातच त्यापासून उत्पन्न होणारा तांदूळ (सीएमआर) सार्वजनिक वितरण व्यवस्थेकरिता वितरित करता येणार आहे. तसेच योजनेंतर्गत खरेदी होणाऱ्या धानासाठी येणारा साठवणूक खर्च, वाहतूक खर्च यामध्ये मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी किमान आधारभूत किंमत, वाहतूक खर्च, गोदाम भाडे, हमाली खर्च, सॅम्पलिंग, वाढीव अर्थसहाय्य यासाठी आर्थिक सहाय्य प्राप्त होणार आहे. (विशेष प्रतिनिधी)
शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा होण्यासह त्यांना हमी भावापेक्षा कमी किंमतीने धान्य विकावे लागू नये यासाठी शासनातर्फे धान्याची खरेदी करण्यात येते.

Web Title: Decentralized purchase scheme for Dhan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.