डेक्कन क्वीन अंबरनाथजवळ रखडली, प्रवाशांचे हाल

By Admin | Updated: July 7, 2016 12:05 IST2016-07-07T12:03:40+5:302016-07-07T12:05:38+5:30

सीएसटीजवळ उद्यान एक्स्प्रेसचे इंजिन घसरल्याने मध्य रेल्वे विस्कळीत झालेली असतानाच आता डेक्कन क्वीन अंबरनाथ स्टेशनजवळ रखडल्याने मुंबई-पुणे प्रवास करणा-यांचे हाल होत आहेत.

Deccan Queen, near Ambernath, passes away | डेक्कन क्वीन अंबरनाथजवळ रखडली, प्रवाशांचे हाल

डेक्कन क्वीन अंबरनाथजवळ रखडली, प्रवाशांचे हाल

>ऑनलाइन लोकमत
अंबरनाथ, दि. ७ - सीएसटीजवळ उद्यान एक्स्प्रेसचे इंजिन घसरल्याने मध्य रेल्वे विस्कळीत झालेली असतानाच आता डेक्कन क्वीन अंबरनाथ स्टेशनजवळ रखडल्याने मुंबई-पुणे प्रवास करणा-यांचे हाल झाले आहेत. 
गुरूवारी सकाळी सीएसटीहून सुटलेल्या उद्यान एक्स्प्रेसचे इंजिन सीएसटी-मस्जिददरम्यान घसरले आणि मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. भायखळा ते सीएसटीदरम्यान फास्ट ट्रॅकवरील अप व डाऊन मार्ग पूर्णपणे ठप्प झाल्याने रेल्वे वाहतूक स्लो ट्रॅकवर वळवण्यात आली. त्यामुळे मध्ये रेल्वेचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले व गाड्या रखडल्याने चाकरमान्यांना त्रास सहन करावा लागला. 
याचा परिणाम इतर गाड्यांवरही झाला आणि डेकक्न क्वीन अंबरनाथ जवळ लटकली. तसेच सीएसटी-लखनऊ पुष्पक एक्स्प्रेस तासभर उशीराने धावत आहे. तर दुरांतो एक्सप्रेस ठाण्याला रद्द करण्यात आली असून पंचवटी एक्स्प्रेसही दोन तास उशीराने धावत आहे. 

Web Title: Deccan Queen, near Ambernath, passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.