रत्नागिरीत सुमद्रात बुडून तरुणाचा मृत्यू

By Admin | Updated: August 17, 2015 00:51 IST2015-08-17T00:51:37+5:302015-08-17T00:51:37+5:30

गुहागर व गणपतीपुळे येथे दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये समुद्रात बुडालेल्या चार तरुणांपैकी तिघांना वाचवण्यात स्थानिकांना यश आले,

Death of youth by rush to Ratnagiri | रत्नागिरीत सुमद्रात बुडून तरुणाचा मृत्यू

रत्नागिरीत सुमद्रात बुडून तरुणाचा मृत्यू

गुहागर/गणपतीपुळे : गुहागर व गणपतीपुळे येथे दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये समुद्रात बुडालेल्या चार तरुणांपैकी तिघांना वाचवण्यात स्थानिकांना यश आले, तर एकाचा बुडून मृत्यू झाला.
मोहित कौशिक (२३) असे मृत तरुणाचे नाव असून, तो पुण्याचा रहिवासी आहे. मोहित कौशिक, राकेशचंद्र शर्मा (२३), आकाश रवींद्रकुमार शिण्णोई (२२), शुभम शर्मा, दीपाली जैसवाल (२३), रजत गुप्ता (२३) हे पुण्यातील हिंजवाडी येथे सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करतात. स्वातंत्र्यदिनाची सुट्टी असल्याने ते गणपतीपुळे येथे फिरायला आले होते. दुपारी ३.३० वाजता चार तरुण समुद्रात पोहण्यासाठी उतरले. मात्र मोहित व रजत पाण्यात बुडायला लागल्याने स्थानिक व्यापाऱ्यांनी समुद्रात उड्या घेऊन त्यांना बाहेर काढले. त्यांना आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी मोहितला मृत घोषित केले.

Web Title: Death of youth by rush to Ratnagiri