मोटारीच्या सहाय्याने पाणी भरताना विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू

By Admin | Updated: May 5, 2016 18:44 IST2016-05-05T18:29:11+5:302016-05-05T18:44:48+5:30

चांदवड तालुक्यातील दुगाव येथे वीज मोटरीच्या सहाय्याने पाणी भरत असतांना विजेचा धक्का लागून संजय अशोक पवार (३३) या तरुणाचा मृत्यू झाला. पंधरा दिवसांनंतर नळाला पाणी आले होते.

The death of the youth due to electric shock caused by the help of the vehicle | मोटारीच्या सहाय्याने पाणी भरताना विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू

मोटारीच्या सहाय्याने पाणी भरताना विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू

ऑनलाइन लोकमत

नाशिक, दि. ५ : चांदवड तालुक्यातील दुगाव येथे वीज मोटरीच्या सहाय्याने पाणी भरत असतांना विजेचा धक्का लागून संजय अशोक पवार (३३) या तरुणाचा मृत्यू झाला. पंधरा दिवसांनंतर नळाला पाणी आले होते. कमी दाबाने पाण्याचा पुरवठा होत असल्याने इलेक्ट्रिक मोटारीच्या सहाय्याने पाणी भरत असतांना ही दुर्घटना घडली. तालुक्यात पाणी टंचाईचा बळी गेल्याची चर्चा होत आहे.
त्यांंच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दीड वर्षाचा मुलगा असा परिवार आहे. संजय हा एकुलता एक मुलगा असल्याने वृध्द आई - वडिलांचा आधार गेला आहे. परिसरात या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. (वार्ताहर)

Web Title: The death of the youth due to electric shock caused by the help of the vehicle