भरमसाठ वीजबिलाच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

By Admin | Updated: August 31, 2016 05:21 IST2016-08-31T05:21:11+5:302016-08-31T05:21:11+5:30

विद्युत वितरण कंपनीकडून आलेल्या भरमसाट घरगुती बिलाबाबत चौकशी करण्याकरिता सासवड येथील विद्युत वितरणच्या कार्यालयात आलेल्या युवकाचा हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला

The death of the young person with a lot of electricity | भरमसाठ वीजबिलाच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

भरमसाठ वीजबिलाच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

सासवड (जि. पुणे) : विद्युत वितरण कंपनीकडून आलेल्या भरमसाट घरगुती बिलाबाबत चौकशी करण्याकरिता सासवड येथील विद्युत वितरणच्या कार्यालयात आलेल्या युवकाचा हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी घडली. मोहन रमेश न्हालवे (३०, सासवड ) असे मृताचे नाव आहे. ही घटना समजल्यानंतर परिसरातील नागरिकांनी विद्युत वितरणच्या कार्यालयात जाऊन तोडफोड केली.
याबाबत उशिरापर्यंत पोलिसांनी फिर्याद न घेतल्याने मृत मोहन न्हालवे यांचा भाऊ रंजित यांनी माहिती दिली. मोहन यांच्या घराचे वीजबिल सुमारे ३० हजार रुपये आल्याने सात ते आठ दिवसांपूर्वी वीजपुरवठा खंडित केला होता. मोहन यांनी अनेकदा कार्यालयात जाऊन वीजबिल कमी करण्यासंबंधी मागणी केली होती. तथापि, त्यांना एकाही अधिकाऱ्याने समाधानकारक उत्तर दिले नाही. दरम्यान, यांनी आज सासवड येथे उपकार्यकारी अभियंता हितेंद्र भिरूड यांची भेट घेतली असता, त्यांच्याकडूनही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने त्यांना मानसिक त्रास होऊन हृदयविकाराचा झटका आला. (वार्ताहर)

Web Title: The death of the young person with a lot of electricity