सेल्फी काढताना मृत्यू, दरीत कोसळून नाशिक रोड येथील तरूणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 03:50 IST2017-09-05T03:50:12+5:302017-09-05T03:50:18+5:30

विश्रामगड पट्टाकिल्ला परिसरात कड्यावरून खोल दरीत कोसळून नाशिक रोड येथील अभिषेक विनोदकुमार उपाध्याय (२६) याचा मृत्यू झाला.

 Death of a young man in Nashik Road collapsed after death | सेल्फी काढताना मृत्यू, दरीत कोसळून नाशिक रोड येथील तरूणाचा मृत्यू

सेल्फी काढताना मृत्यू, दरीत कोसळून नाशिक रोड येथील तरूणाचा मृत्यू

अकोले (जि. अहमदनगर) : विश्रामगड पट्टाकिल्ला परिसरात कड्यावरून खोल दरीत कोसळून नाशिक रोड येथील अभिषेक विनोदकुमार उपाध्याय (२६) याचा मृत्यू झाला. तो एकुलता एक होता. सेल्फी काढण्याच्या नादात तोल जाऊन तो दरीत पडल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
रविवारी रात्री ही घटना घडली. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. सोमवारी सकाळी दरीतून त्याचा मृतदेह काढण्यात आला. अभिषेकने घरी सिनेमाला जातो, असे सांगितले होते. मात्र तीन मित्रांसोबत तो विश्रामगडला आला. पवनचक्की क्रमांक ५४ च्या बाजूला कोकणकड्यावर हे मित्र आले होते.

Web Title:  Death of a young man in Nashik Road collapsed after death